तब्बल २५१ वीज मिटर चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 12:34 PM2020-12-05T12:34:00+5:302020-12-05T12:34:17+5:30
n लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : खांडबारा येथील महावितरणच्या कार्यालय आवारातून चोरट्यांनी दोन वर्षात तब्बल २५१ वीज मिटर चोरीस ...
n लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : खांडबारा येथील महावितरणच्या कार्यालय आवारातून चोरट्यांनी दोन वर्षात तब्बल २५१ वीज मिटर चोरीस गेल्याची घटना घडली. मिटरची एकुण किंमत दोन लाख ४२ हजार ९६८ इतकी आहे. या प्रकारामुळे महाविरणमध्ये खळबळ उडाली आहे.
खांडबारा येथे महावितरणचे कार्यालय आहे. या ठिकाणी सिंगल फेजसाठी एकुण २५१ वीज मिटर ठेवण्यात आले होते. त्यात एचएलपी कंपनीचे १०३, जेनीअस कंपनीचे ६०, एल ॲण्ड टी कंपनीचे ८८ वीज मिटरचा समावेश होता. एका वीज मिटरची किंमत ९६८ रुपये इतकी आहे. त्यामुळे एकुण तब्बल दोन लाख ४२हजार ९६८ रुपये किंमतीचे वीज मिटरची किंमत आहे.
हर्षद सरवरसिंग वळवी यांनी खांडबारा येथील कार्यालायाचा पदभार घेतल्यानंतर त्यांनी सर्व आवश्यक वस्तूंची खातरजमा केली. त्यावेळी त्यांना तब्बल २५१ वीज मिटर नसल्याचे दिसून आले. त्यांनी याबाबत चौकशी केली परंतु काही उपयोग झाला नाही. त्यानंतर त्यांनी वरिष्ठांना ही बाब कळविल्यांतर गुन्हा दाखल करण्याचे सांगण्यात आले.
याबाबत हर्षद वळवी यांनी ३ डिसेंबर रोजी विसरवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरिक्षक बी.व्ही.बैसाणे करीत आहे. या चोरीच्या प्रकारामुळे महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.