नंदुरबारातील 254 शाळा क्रीडांगणाच्या प्रतिक्षेत

By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Published: December 29, 2017 01:19 PM2017-12-29T13:19:28+5:302017-12-29T13:19:58+5:30

254 schools in Nandurbar await the playground | नंदुरबारातील 254 शाळा क्रीडांगणाच्या प्रतिक्षेत

नंदुरबारातील 254 शाळा क्रीडांगणाच्या प्रतिक्षेत

googlenewsNext

संतोष सूर्यवंशी । 
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : एकीकडे राज्य शासनाकडून चला खेळूया, अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय आदी विविध क्रीडा उपक्रमांचा गवगवा करण्यात येत आह़े परंतु प्रत्यक्षात मात्र जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक विभागातील तब्बल 254 शाळांना क्रीडांगणच नसल्याचे समोर आले आह़े त्यामुळे एकीकडे मराठी शाळांमध्ये क्रीडांगण नसताना नवनवीन उपक्रमांचा उदोउदो कशासाठी असा प्रश्न आता पालकांकडून विचारण्यात येत आह़े 
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची सख्या एकूण 1 हजार 393 इतकी आह़े त्यापैकी 235 शाळांना क्रीडांगण नसल्याची माहिती आह़े तर, दुसरीकडे माध्यमिक विभागाच्या एकूण 406 शाळांपैकी 19 शाळांना क्रीडांगण नसल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ़ राहुल चौधरी यांनी सांगितल़े त्यामुळे जिल्ह्यातील 254 मराठी शाळांना आपल्या हक्काचे क्रीडांगण नसल्याने अंगी प्रतिभा असूनही येथील खेळाडूंना भौतिक सुविधांअभावी आपल्या डोळ्यातील स्वपA पुर्ण करण्यास अडचणी येत आह़े प्राथमिक शिक्षण, क्रीडा यापासूनच भाविष्यातील खेळाडू, सशक्त पिढीची निर्मिती होत असत़े 
परंतु शिक्षणाच्या पहिल्या पायरीवरच विद्याथ्र्याना आवश्यक भौतिक सोयी-सुविधा मिळत नसल्याने यातून भावी पिढी कशी काय निर्माण होणार असा प्रश्न उपस्थित होत आह़े क्रीडांगण नसल्यामुळे अनेक होतकरु विद्याथ्र्याना आपल्या आवडीच्या खेळांचा आनंद घेता येत नाही़ अनेक खेळाडून शाळेपासून कोसोदुर क्रीडांगणाच्या शोधात फिरत असतात़ त्यामुळे त्यांची यातून मोठी हेडसांडही होत असत़े 
उपक्रमांचा होतेय उदोउदो
राज्य शासनाकडून चला खेळूया, अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय आदी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत़ परंतु एकीकडे जिल्ह्यातील 254 शाळा व शेकडो विद्यार्थी कुठलाही  क्रीडा प्रकार खेळण्यासाठी आवश्यक असलेल्या क्रीडांगणापासूनच वंचित रहावे लागत  असताना नवनवीन उपक्रमांचा उदोउदो कशासाठी? असा प्रश्न विचारत आहेत़ 
जिल्ह्यात मोठय़ा संख्येने आदिवासी विद्यार्थी आहेत़ आधिच जेमतेम शिक्षणाचा खर्च उचलने त्यांना शक्य होत असत़े त्यामुळे  मराठी शाळांमध्येच प्रवेश घेण्याची त्यांची क्षमता असत़े खाजगी शाळांचा शुल्क, डोनेशन त्यांना परवडणारा नसतो़ शासनाचे उपक्रम हे खाजगी शाळांमध्ये राबविणे शक्य असल्याने मराठी शाळेतील विद्यार्थी मात्र या उपक्रमांपासून काही अंशी वंचितच म्हणावा लागेल़ त्यामुळे मराठी शाळांमधील विद्याथ्र्याच्या कलागुणांना वाव मिळत नाही़
शेतशिवारात होतोय सराव.
जिल्ह्यातील अनेक होतकरु विद्याथ्र्यी विविध खेळात पारंगत आहेत़ परंतु क्रीडांगणाअभावी त्यांना विविध खेळांचा सराव करणेही शक्य होत नाही़ त्यामुळे ते शेतशिवारातच आपल्या खेळाचा सराव करताना दिसून येत असतात़ 
नंदुरबार जिल्ह्यातील अनेक खेळाडू प्रतिभासंपन्न आहेत़ याआधिही जिल्ह्यातून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या क्रीडा कौशल्यामुळे त्यांनी नावलौकिक मिळवले आह़े परंतु अजूनही पाहिजे त्या प्रमाणात भौतिक सुविधा मिळत नसल्याने याकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींनीही लक्ष देण्याची आवश्यकता आह़े
 

Web Title: 254 schools in Nandurbar await the playground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.