नंदुरबारातील शेतक-यांना 26 कोटींचे पीक कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 12:54 PM2018-06-13T12:54:55+5:302018-06-13T12:54:55+5:30

47 टक्के कर्ज वाटप : साडेतीन हजार शेतक:यांना मिळाली रक्कम

26 crore crop loan allocated to Nandurbar farmers | नंदुरबारातील शेतक-यांना 26 कोटींचे पीक कर्ज वाटप

नंदुरबारातील शेतक-यांना 26 कोटींचे पीक कर्ज वाटप

Next

नंदुरबार : धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून यंदा दोन्ही जिल्ह्यातील 18 हजार शेतक:यांना पीक कर्ज वाटपाचे नियोजन होत़े यात  खरीप पेरण्यांना सुरुवात होऊनही सुधारण झाली नसून नंदुरबार जिल्ह्यात केवळ साडेतीन हजार शेतक:यांना कजर्पुरवठा होऊ शकला आह़े 
खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी यंदा जिल्हा बँकेकडून 1 एप्रिलपासून कर्ज वाटपाच्या प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली होती़ नंदुरबार जिल्ह्यात बँकेच्या 28 शाखांसह 205 विविध कार्यकारी संस्थांच्या माध्यमातून हे कर्ज वाटप करण्यात येत आह़े जून महिना उजाडल्याने या वितरणाला वेग येण्याची चिन्हे असताना मात्र जिल्ह्यात कर्ज वाटप संथगतीने सुरू आह़े बँकेने तत्काळ कर्ज वाटपास मंजुरी दिली असली तरी शेतक:यांना ऑनलाइन सातबारा आणि इतर कागदपत्रे मिळत नसल्याने तलाठय़ांकडे त्यांच्या फे:या सातत्याने वाढत आहेत़ खरीप कर्ज वाटप सुलभ व्हावे यासाठी जिल्हा बँकेने विविध कार्यकारी संस्थांना यंदा एप्रिलपूर्वीच सूचना केला होत्या़ यात नंदुरबार 59, शहादा 60, तळोदा 14, अक्कलकुवा 3, तर नवापूर तालुक्यातील 25 संस्थांनी कर्ज वाटपाची तयारी दर्शवली होती़ यासोबत 28 शाखांमधून पीक कर्ज वाटप सुरू झाले होत़े यंदा जिल्ह्यातील 5 हजार 796 शेतक:यांना कर्ज वाटप करण्याचा लक्ष्यांक बँकेने नंदुरबार जिल्ह्यासाठी निर्धारित केला होता़ यानुसार 8 जूनर्पयत नंदुरबार 1 हजार 318, शहादा 1 हजार 581, तळोदा 198, अक्कलकुवा 23, तर नवापूर तालुक्यातील 578 अशा एकूण 3 हजार 598 शेतक:यांना 26 कोटी 65 लाख 46 हजार रुपयांच्या पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आह़े निर्धारित लक्ष्यांकाच्या केवळ 47 टक्के शेतक:यांना आतार्पयत पीक कर्ज वाटप झाले आह़े 
पीक कर्जासाठी सध्या शेतकरी सकाळपासून बँका आणि सोसायटीकडे संपर्क करत असले तरी या शेतक:यांना ऑनलाइन सातबारा मिळत नसल्याने त्यांच्या कर्ज प्रक्रियेत अडथळे येत आहेत़ यात सुधारणा झाल्यास शेतक:यांना कर्ज मिळणे सुलभ होणार आह़े जिल्ह्यात बँकेने 26 कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले असतानाच दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची स्थिती सुधारत असल्याचे चित्र आह़े जिल्ह्यात आजअखेरीस 10 हजार 370 शेतक:यांना शासनाकडून 32 कोटी 75 लाख 32 हजार रुपयांचे कर्ज माफ करण्यात आल्याची माहिती आह़े यासाठी दीड लाख रुपयांच्यावर कर्ज असलेल्या शेतक:यांचे कर्ज माफ होऊन शेतक:यांकडून कजर्माफीतील काही रकमेचा भरणाही करण्यात आला आह़े योजनेसाठी जिल्हा बँकेच्या 26 शाखांसह 12 राष्ट्रीयकृत बँकांच्या विविध 63 शाखांमध्येही कजर्माफीच्या परताव्याची रक्कम शेतक:यांच्या खात्यांमध्ये वर्ग झाली आह़े 
जिल्हा बँकेच्या शाखांसह जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांच्या विविध शाखांमधूनही अद्याप केवळ 4 हजार शेतक:यांना कर्ज वाटप झाल्याची माहिती आह़े या कर्ज वाटपासाठी शेतक:यांना बँकांकडून कळविण्यात आले होत़े शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कर्ज वाटपाला वेग आह़े राष्ट्रीयकृत बँकांनी तब्बल 37 कोटी रुपयांर्पयत कर्जाचे वाटप करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आह़े अद्याप अधिकृत आकडेवारी प्रसिद्ध झाली नसली तरी बुधवारी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत होणा:या आढावा बैठकीत याबाबत खुलासा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आह़े अग्रणी बॅकेकडून आकडय़ांची जुळवाजुळव सुरू होती़ 
 

Web Title: 26 crore crop loan allocated to Nandurbar farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.