आश्रमशाळांमधील 27 हजार 700 विद्याथ्र्याना मिळाला लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 12:43 PM2018-06-15T12:43:10+5:302018-06-15T12:43:10+5:30

27 thousand 700 students benefitted from the Ashram schools | आश्रमशाळांमधील 27 हजार 700 विद्याथ्र्याना मिळाला लाभ

आश्रमशाळांमधील 27 हजार 700 विद्याथ्र्याना मिळाला लाभ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शासकीय आश्रम शाळांमधील विद्याथ्र्याना वैयक्तिक वापराच्या वस्तूंसाठी थेट निधी हस्तांतरण योजनेंतर्गत गेल्या शैक्षणिक वर्षात नंदुरबार प्रकल्पात एकूण 10 हजार 777 विद्याथ्र्याना दोन कोटी 95 लाख 29 हजार 420 रुपयांचे वाटप करण्यात आले होते. तळोदा प्रकल्पात 16 हजार 941 विद्याथ्र्याना सहा कोटी 86 लाख 80 हजार रुपयांचे वाटप करण्यात आले. दरम्यान, यंदा मुख्याध्यापकांच्या खात्याऐवजी थेट विद्यार्थी व पालकांच्या संयुक्त खात्यात ही रक्कम जमा होणार आहे.
आदिवासी प्रकल्प कार्यालयांतर्गत शासकीय आश्रमशाळांमधील विद्याथ्र्याना वैयक्तिक वापराच्या वस्तूंबाबत नेहमीच ओरड होत होती. कमिशनची टक्केवारी, निकृष्ट दर्जाच्या वस्तू, विद्याथ्र्यार्पयत वस्तूच न पोहचणे यासह इतर तक्रारी नेहमीच्याच झाल्या होत्या. विद्यार्थीदेखील याबाबत वेळोवेळी आंदोलने करीत होती. ही बाब लक्षात घेता आदिवासी विकास विभागाने गेल्या वर्षापासून 17 प्रकारच्या वैयक्तिक वापराच्या वस्तूंसाठी थेट विद्याथ्र्याच्या खात्यावर ठरावीक रक्कम टाकण्याचा निर्णय घेतला होता. पहिले वर्ष असल्यामुळे काही प्रमाणात त्रुटी राहिल्या.  
या वस्तूंसाठी आहे योजना
विद्याथ्र्याच्या नियमित वापराच्या एकूण 17 प्रकारच्या वस्तूंसाठी ही योजना कार्यान्वित आहे. या वस्तूंमध्ये छत्री, नाईट ड्रेस, वुलन स्वेटर, सॅण्डल, व्हाईट कॅनव्हास शूज, व्हाईट सॉक्स (दोन जोडय़ा), अंघोळीचा साबण (10), कपडे धुण्याचा साबण (30), खोबरेल तेल (200 मि.ली.च्या दहा बाटल्या), टूथपेस्ट (100 ग्रॅम-दहा नग), टूथ ब्रश (चार नग), कंगवा (दोन), नेल कटर (दोन), मुलींसाठी निळ्या रिबीन (दोन जोड), टॉवेल, अंडर गारमेंट, स्लिपर या वस्तूंचा समावेश आहे. 
नंदुरबार : 10,777 विद्यार्थी
नंदुरबार प्रकल्पांतर्गत गेल्या शैक्षणिक वर्षात एकूण 29 आश्रम शाळांमधून 12 हजार 229 प्रवेशित विद्याथ्र्यासाठी आयुक्तालय स्तरावरून  पहिल्या हप्त्यासाठी अर्थात 60 टक्केप्रमाणे दोन कोटी 87 लाख सात हजार 360 रुपये निधी वितरीत करण्यात आला होता. त्यापैकी पहिला हप्ता अर्थात दोन हजार 640 रुपयेप्रमाणे 10 हजार 777 विद्याथ्र्याना वाटप करण्यात आला. ती रक्कम दोन कोटी 84 लाख 51 हजार 280 रुपये विद्याथ्र्याच्या बँक खात्यात जमा करण्यात आले होते. 
40 टक्केप्रमाणे दुसरा हप्ता एक हजार 760 रुपयेप्रमाणे वाटप करण्यात आला. त्यात 29 आश्रमशाळांमधील  10 हजार 777 विद्याथ्र्यासाठी दोन कोटी 95 लाख 29 हजार 420 रुपये आयुक्तालय स्तरावरून मंजूर झाले होते. सर्वच निधी विद्याथ्र्याच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला होता.
यंदा थेट विद्याथ्र्याच्या खात्यावर
गेल्या शैक्षणिक वर्षात या योजनेचे पहिले वर्ष होते. त्यामुळे अनेक विद्याथ्र्याचे बँक खाते उघडलेले नव्हते. त्यामुळे प्रकल्प कार्यालयाकडून संबंधित आश्रमशाळा मुख्याध्यापकांच्या बँक खात्यात रक्कम टाकण्यात आली होती. तेथून ती रक्कम संबंधित विद्याथ्र्याच्या खात्यावर टाकली गेली होती. यंदा सर्वच प्रवेश घेणा:या विद्याथ्र्याना बँक खाते सक्तीचे करण्यात आल्याने आता मुख्याध्यापकऐवजी थेट विद्याथ्र्याच्या खात्यावर हा निधी जमा होणार आहे. येत्या आठ दिवसात ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.
तळोदा : सहा कोटी वाटप
तळोदा प्रकल्प कार्यालयांतर्गत गेल्या शैक्षणिक वर्षात 16 हजार 941 विद्याथ्र्याना सहा कोटी 86 लाख 80 हजार 25 रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले. 
तळोदा प्रकल्पात तळोदा, अक्कलकुवा, धडगाव या तिन्ही दुर्गम तालुक्यांमध्ये 42 शासकीय आश्रमशाळा आहेत. या शाळांमध्ये 16 हजार 945 विद्यार्थी शिक्षण घेत होते. यापैकी जवळपास सर्वच विद्याथ्र्याना डीबीटी योजनेंतर्गत पैसे देण्यात आले होते. एकूण सहा कोटी 86 लाख 80 हजार 25 रुपयांचा एकूण निधी होता. तीन टप्प्यात अर्थात एक हजार 200, एक हजार 115 व एक हजार 585 अशा तीन टप्प्यात एकूण सहा कोटी 86 लाख 80 हजार 25 रुपयांची रक्कम वाटप करण्यात आली.  

Web Title: 27 thousand 700 students benefitted from the Ashram schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.