नंदुरबार जिल्ह्यातील 28 शिक्षकांची मान्यता रद्द

By admin | Published: June 14, 2017 01:17 PM2017-06-14T13:17:22+5:302017-06-14T13:17:22+5:30

नंदुरबार जिल्ह्यातील 28 शिक्षकांची मान्यता रद्द करण्याचे आदेश विभागीय शिक्षण उपसंचालकांनी दिले आहेत.

28 teachers rejected in Nandurbar district | नंदुरबार जिल्ह्यातील 28 शिक्षकांची मान्यता रद्द

नंदुरबार जिल्ह्यातील 28 शिक्षकांची मान्यता रद्द

Next

ऑनलाईन लोकमत

नंदुरबार, दि. 14 - शिक्षक भरतीला शासनाची बंदी असताना तथा नियमबाह्य शिक्षक भरती केल्याने नंदुरबार जिल्ह्यातील  28 शिक्षकांची मान्यता रद्द करण्याचे आदेश विभागीय शिक्षण उपसंचालकांनी दिले आहेत. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
शिक्षक भरतीला 2012 मध्ये शासनाने बंदी केली होती. शिवाय याच काळात अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्नही चर्चेत आला. त्यामुळे संस्थांमध्ये शिक्षक भरतीचा विषय गुंतागुंतीचा ठरला होता. अशी स्थिती असताना जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये नियमबाह्य शिक्षक भरती झाल्याचे प्रकार शिक्षण उपसंचालकांच्या लक्षात आल्याने त्याबाबतची तपासणी सुरू होती. यासंदर्भात शिक्षण विभागाच्या आयुक्तांनी प्रत्येक जिल्ह्यात किती मान्यता दिल्या याचा अहवालही मागवला होता. त्यानुसार प्रकरणांची चौकशी होऊन गेल्या 24 ते 26 मे 2017 च्या काळात  नाशिक येथे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयात संबंधित शिक्षकांची  व अधिका:यांची सुनावणी झाली. या सुनावणीनंतर 28 शिक्षकांची मान्यता नियमबाह्य झाल्याचे निदर्शनास आले.
ही भरती करताना शिक्षक भरतीमध्ये शिक्षण विभागाची परवानगी न घेणे, भरतीची जाहिरात न देणे, भरतीत आरक्षण डावलून पदांना मान्यता देणे, अतिरिक्त शिक्षकांची संख्या तसेच त्यांचे प्रश्न विचारात न घेताच शिक्षक भरती करणे आदी विविध प्रकार समोर आले. त्यामुळे जिल्ह्यातील 28 शिक्षकांची मान्यता रद्द करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालकांनी दिले आहेत. याशिवाय अल्पसंख्याकाच्या नावाखाली करण्यात आलेल्या भरतीतही बंधने डावलून भरती केल्याचा आक्षेप आहे. एकूणच नियमबाह्य भरतीचे प्रकार जिल्ह्यात समोर आले असून इतरही शिक्षकांची सुनावणी उपसंचालकांच्या कार्यालयात होणार आहे.
दरम्यान, 28 शिक्षकांची भरती नियमबाह्य झाल्याने त्यांची मान्यता रद्द करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालकांनी दिल्यानुसार जिल्हा शिक्षणाधिकारी तेजराव गाडेकर यांनी त्याबाबतची अंमलबजावणी सुरू केली आहे.

Web Title: 28 teachers rejected in Nandurbar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.