नंदुरबारातील 28 हजार वीज ग्राहकांची उडतेय त्रेधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 11:21 AM2018-07-10T11:21:27+5:302018-07-10T11:21:32+5:30
मुख्य कार्यालयातील बील भरणा बंद : शहरात केवळ सात बील भरणा केंद्र सुरू
नंदुरबार : शहरातील 28 हजार वीज ग्राहकांची सध्या मासिक वीज भरणा करण्यासाठी मोठी धावपळ उडत आह़े वीज कंपनीच्या बसस्टँडसमोरील विभागीय कार्यालयातील एटीपी सेंटर बंद करण्यात आल्याने ही गैरसोय झाली आह़े शहरात याव्यतिरिक्त केवळ सात भरणा केंद्र असून तेथेही गर्दी होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत़
वीज वितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयाच्या आवारात असलेल्या या एटीपी सेंटरवर शहरासह ग्रामीण भागातूनही नागरिक येत होत़े घरगुती वीज बिलांसह, शेतीपंप आणि लघुउद्योगांची बिले येथे भरली जात होती़
कंत्राटी तत्त्वावर सुरू असलेले हे सेंटर राज्यस्तरावरून बंद करण्याचे आदेश देण्यात आले होत़े पर्यायी व्यवस्था निर्माण न करता वीज बिल भरणा केंद्र बंद झाल्याने वीज ग्राहकांसोबतच वीज कंपनीचेही नुकसान होत असून मासिक महसुलात 10 टक्के घट झाली आह़े नंदुरबार शहरात 28 हजार 58 वीज ग्राहक आहेत़ त्यांच्याकडून महिन्याकाठी 4 कोटी 50 लाख रुपये सरासरी भरले जातात़ बसस्टँड समोरील विभागीय कार्यालयाच्या आवारातील केंद्र बंद झाल्याने कार्यालयीन वीज बिल भरणा सुरू झाला आह़े यासोबत 3 पतसंस्था, जिल्हा बँकेच्या दोन शाखा, गोवर्धन सहकारी बँकेच्या 2 शाखा अशा सात ठिकाणी बिलांचा भरणा होतो आह़े परंतु याठिकाणी दिवसभरात पाच ते सहा तासांच्या वर बिल भरणा होत नाही़ यात कामकाज हे वेगाने होत नसल्याने नागरिकांच्या रांगा वाढतात़ पूर्वी सुरू असलेल्या एटीपी सेंटरमध्ये अवघ्या काही सेकंदात बिलाचा भरणा होत असल्याने नागरिक तत्काळ मार्गस्थ होत होत़े सात केंद्रांची योग्य माहिती नसल्याने सध्या बिल भरण्यासाठी जावे कोठे अशी वीज ग्रहकांची स्थिती आह़े यातील जिल्हा बँकेची एक शाखा ही पालिका चौकातील नवीन शॉपिंग कॉम्पलेक्समध्ये दुस:या मजल्यावर आह़े येथे जाणे ज्येष्ठांना शक्य होत नसल्याने ते पतपेढय़ांच्या बाहेर उन्हातान्हात रांगा लावत आहेत़ नंदुरबार शहरात 1 सहकारी बँक आणि 1 पतसंस्था यांचे प्रस्ताव कंपनीकडे देण्यात आले आहेत़ हे प्रस्ताव जवळजवळ मंजूर झाले आहेत़ यातील पतसंस्थेने रात्री 10 र्पयत बिलांचा भरणा करून घेण्याची तयारी दर्शवली आह़े येत्या आठवडय़ात ही दोन्ही केंद्रे सुरू होण्याची दाट शक्यता आह़े शहरालगतच्या वसाहती ह्या ग्रामीण फिडरमध्ये मोडत असल्या तरी नागरिक हे शहरी सं™ोत येतात़ त्यांची बिले ग्रामीण ऐवजी शहरी भागातील पतसंस्था आणि बँकांनी स्विकारण्याची मागणी करण्यात आह़े तशा सूचना संबधितांना करण्याची अपेक्षा आह़े शहरात ऑनलाईन बिल भरणा:यांची संख्या ही 1 टक्का आह़े सायबर कॅफे किंवा इतर ठिकाणी बिल भरण्यासाठी जादाचे 10 ते 20 रुपये द्यावे लागत असल्याने नागरिक रांगेत उभे राहून वीज बिल भरण्यास पसंती देतात़ वीज कंपनीने यासाठी नव्याने बील भरणा केंद्र सुरू करण्याची मागणी ग्राहकांकडून होत आह़े एकीकडे शहरीभागात ही स्थिती असताना दुसरीकडे ग्रामीण भागातील 36 हजार वीज ग्राहक आणि कृषीपंप धारकांचेही हाल सुरू आहेत़ नंदुरबार बसस्थानकासमोरच बिल भरण्याची सोय असल्याने ग्रामस्थ येऊन बिल भरून जात होत़े परंतु हे सेंटर बंद झाल्याने आता ते गावाकडे पोस्ट ऑफिस आणि जिल्हा बँकेच्या शाखेत बिल भरत आहेत़ ग्रामीण उपविभाग 1 मध्ये 17 हजार 500 ग्राहकांसाठी 28 बिल भरणा केंद्र आहेत़ यात जिल्हा बँकेच्या 5 शाखा आहेत़ यासोबतच रनाळे, वैंदाणे, शिंदे, कोपर्ली, खोंडामळी, शनिमांडळ या उपकेंद्रांमध्ये ग्राहकांची बिल भरणा करण्याची सोय झाली आह़े उपविभाग 2 मध्ये 18 हजार 500 ग्राहकांच्या सोयीसाठी 28 पोस्ट ऑफिस आणि 2 बँका आहेत़ या दोन्ही जिल्हा बँकेच्या शाखा नंदुरबार शहरात आहेत़ तसेच धानोरा उपकेंद्रातही बिल भरण्याची सोय करण्यात आली आह़े परंतु येथे कर्मचारी भेटत नसल्याने वीज ग्राहकांचे हाल होत असल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत़ लाईनमनकडे अद्यापही पैसे देण्यास ग्राहक धजत नाहीत़