कारच्या बोनेटमध्ये लपविलेला २८ हजाराचा मद्यसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 11:39 AM2020-12-07T11:39:08+5:302020-12-07T11:39:16+5:30

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  जिल्ह्यातून गुजरातमध्ये अवैध दारू घेऊन जाणारऱ्या एकास एलसीबीने अटक केली. त्याच्याकडून तीन लाख २८ ...

28,000 worth of liquor hidden in car bonnet seized | कारच्या बोनेटमध्ये लपविलेला २८ हजाराचा मद्यसाठा जप्त

कारच्या बोनेटमध्ये लपविलेला २८ हजाराचा मद्यसाठा जप्त

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :  जिल्ह्यातून गुजरातमध्ये अवैध दारू घेऊन जाणारऱ्या एकास एलसीबीने अटक केली. त्याच्याकडून तीन लाख २८ हजार रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अलिशान कारच्या बोनेटमध्ये, दरवाजाच्या कव्हरमध्ये तब्बल १९० दारुच्या बाटल्या लपविलेल्या आढळून आल्या. पोलिसांनी कारसह सव्वातीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून एकाला अटक केली आहे. 
घन:शामभाई खमजीभाई खेनी, रा.सुरत असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलीस सूत्रांनुसार, तळोदाहून नळवामार्गे नंदुरबारात अवैध दारू घेऊन कार येतत असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे निरिक्षक विजयसिंग राजपूत यांना मिळाली होती.  त्यानुसार त्यांनी पथकाला या भागात पाळत ठेवण्याचे सांगितले. दुपारी एक वाजेच्या सुमारास नळवा गावाकडून नंदुरबारात येत असलेल्या कार चालकाला अडविले.  पोलिसांना पहाताच त्याचे हावभाव ओळखून पोलिसांनी कारची झडती घेतली. परंतु कारमध्ये काहीच आढळले नाही. परंतु खेनी याची हालचाल संशयास्पद वाटल्याने आणि खबर पक्की असल्याची खात्री असल्याने पुन्हा पोलिसांनी कारची बारकाईने तपासणी केली असता दरवाजाच्या कव्हरमध्ये त्यांना दारूच्या बाटल्या आढळल्या. शिवाय बोनेटमध्ये देखील कप्पा करून त्यात बाटल्या ठेवलेल्या दिसल्या.
 एकुण १९० बाटल्या कारमधून काढण्यात आल्या. त्यांची किंमत २८ हजार रुपये इतकी आहे. पोलिसांनी कारसह एकुण तीन लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.      याबाबत घन:शामभाई खमजीभाई सेनी, रा.सुरत यांच्याविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे निरिक्षक विजयसिंग राजपूत, हवालदार मुकेश तावडे, मनोज नाईक, जितेंद्र ठाकुर यांच्या पथकाने केली. 

Web Title: 28,000 worth of liquor hidden in car bonnet seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.