मातृवंदना योजनेचा १८ हजार ७४७ महिलांना मिळाला लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 12:05 PM2019-12-04T12:05:13+5:302019-12-04T12:05:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मातृवंदना योजनेंतर्गत जिल्ह्यात १८ हजार ७४७ महिलांना सहा कोटी ११ लाखाचे अनुदान देण्यात आले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मातृवंदना योजनेंतर्गत जिल्ह्यात १८ हजार ७४७ महिलांना सहा कोटी ११ लाखाचे अनुदान देण्यात आले आहे. उर्वरीत लाभार्थ्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तालुका व शहरी भागातील आरोग्य संस्थाकडून लाभ देण्यात येत आहे.
आरोग्यदायी राष्ट्र निर्मितीसाठी जिल्ह्यात मातृवंदना सप्ताह राबविण्यात येत आहे. या सप्ताहांतर्गत जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी केले.
दारिद्र्य रेषेखालील व दारिद्र्य रेषेवरील अनेक गर्भवती मातांना गरोदरपणाच्या अखेरपर्यंत मजुरी करावी लागते. यामुळे अशा माता कुपोषित राहुन त्यांच्यांसह त्यांच्या नवजात बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती माता व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करुन त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी, नवजात बालकांचेही आरोग्यात सुधारावे आणि मातामृत्यु व बालमृत्यु दरात घट होऊन तो नियंत्रित राहावा, यासाठी केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू केली आहे.
या योजनेचा दुसरा हप्ता गर्भधारणेच्या सहा महिन्यानंतर प्रसुतीपुर्व तपासणी केल्यास आणि तिसरा हप्ता प्रसुतीनंतर झालेल्या अपत्याची जन्मनोंदणी व बालकास बीसीजीपासुन बाळाचे प्राथमिक लसीकरणपर्यंत संपुर्ण लसीकरणानुसार बँक खात्यात लाभ जमा केला जातो. सप्ताहादरम्यान जास्तीत जास्त नवीन लाभार्थी नोंदणी, आधार शिबीर, बँक खाते शिबीर घेतले जात आहे. अन्य महिलांना संबधित आरोग्य संस्थेकडून लाभ दिला जात आहे.
या योजनेअंतर्ग राज्यातील गर्भवती महिला व स्तनदा माता ज्यांची गर्भधारण झालेल्या महिलांना या योजनेचा लाभ पहिल्या जिवीत अपत्यासाठी दिला जात आहे. तीन टप्प्यांमध्ये पाच हजाराचा लाभ दिला जात असून यासाठी शासकीय आरोग्य संस्थेत नोंदणी करणे आवश्यक आहे.