घोडे बाजारात 300 घोडे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2019 01:06 PM2019-12-01T13:06:22+5:302019-12-01T13:06:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे 11 डिसेंबरपासून एकमुखी दत्तप्रभूंच्या यात्रेला प्रारंभ होत असून यात्रेनिमित्त भरणा:या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे 11 डिसेंबरपासून एकमुखी दत्तप्रभूंच्या यात्रेला प्रारंभ होत असून यात्रेनिमित्त भरणा:या घोडे बाजारात 300 पेक्षा जास्त घोडे दाखल झाले आहे. दरम्यान, चेतक महोत्सवाच्या तयारीलाही वेग आला आहे.
चेतक महोत्सवात अश्व स्पर्धा, महिला सौंदर्य स्पर्धा, डान्स, शरीरसौष्ठव स्पर्धा तसेच मनोरंजनाचे विविध कार्यक्रम होतात. पर्यटकांसाठी टेंट सिटी, नौका विहाराची सुविधा पुरविण्यात येते. येथे येणा:या भाविकांना व भव्य-दिव्य भरणा:या घोडे बाजारात सोयी-सुविधा स्थानिक चेतक फेस्टीवल समितीमार्फत पुरविल्या जातात.
घोडे दाखल
यात्रेनिमित्त भरणा:या घोडे बाजारात 300 पेक्षा जास्त घोडे विक्रीसाठी दाखल झाले आहे. दरवर्षी या बाजारात अडीच हजारापेक्षा जास्त घोडे विक्रीसाठी येतात. येत्या दोन-तीन दिवसात घोडय़ांच्या टापांचा आवाज घुमू लागणार आहे.
कृषी प्रदर्शन
येथील वाघेश्वर मंदिराच्या प्रांगणात 13 ते 17 डिसेंबर दरम्यान कृषी प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनात बियाणे, औषधी, यंत्र, नर्सरी आदींची माहिती देण्यात येणार आहे. यंदा भारतातील सर्वात मोठा बैल हे प्रदर्शन आकर्षण ठरणार आहे. या बैलाला अनेक पारितोषिके देऊन गौरविण्यात आले आहे.