तापीचे 300 कि.मी.चे पात्र पाण्याने फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2019 12:02 PM2019-10-06T12:02:59+5:302019-10-06T12:03:05+5:30

नरेंद्र गुरव ।  लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : हतनूर ते थेट उकई धरणार्पयत सुमारे 300 किलोमीटर्पयत तापी नदी सद्यस्थितीत ...

300 km of Tapi swells with water | तापीचे 300 कि.मी.चे पात्र पाण्याने फुल्ल

तापीचे 300 कि.मी.चे पात्र पाण्याने फुल्ल

googlenewsNext

नरेंद्र गुरव । 
लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : हतनूर ते थेट उकई धरणार्पयत सुमारे 300 किलोमीटर्पयत तापी नदी सद्यस्थितीत दुथडी भरुन वाहत आहे. त्यामुळे तापी नदीवरील सर्व धरणे व बॅरेजेस पूर्ण क्षमतेने भरल्याने समाधान व्यक्त होत आहे.
यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने गेल्या दोन महिन्यापासून तापी नदी दुथडी भरुन वाहत आहे. त्यामुळे या नदीवर असलेल्या धरणे व बॅरेजेसमध्ये पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाला आहे. हतनूर धरण पूर्ण भरल्याने पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये किंवा गेटवरून पाणी जाऊ नये यासाठी दोन गेट उघडण्यात आले आहेत. हतनूरपासून 91 किलोमीटर अंतरावर असलेल्या सुलवाडा बॅरेज पूर्ण भरल्याने तीन गेट उघडण्यात आले आहेत. पुढे सुलवाडापासून 44 किलोमीटरवर असलेल्या सारंगखेडा येथील बॅरेजचेही तीन तर तेथून 28 किलोमीटर अंतरावरील प्रकाशा बॅरेजचेही तीन गेट उघडण्यात आले आहेत. गुजरातमधील उकई धरणही यंदा पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणाचे गेट उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
यंदा समाधानकारक पावसामुळे हतनूर ते उकई धरण हे सुमारे 300 किलोमीटर तापी नदीचे पात्र पाण्याने काठोकाठ भरले आहे. प्रकाशा ते उकई धरण या 133 किलोमीटर तापी नदीच्या पात्रात उकई धरणातील फुगवटय़ाचे पाणी दोन्ही काठ साठले आहे. यंदा तापी नदीवरील सर्वच धरणे व बॅरेजेसमध्ये पूर्ण पाणीसाठा झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
दरम्यान, हतनूर धरणाने पाण्याचा विसर्ग सुरू ठेवल्यामुळे  सुलवाडा, सारंखेडा व प्रकाशा बॅरेजचे गेट  उघडले आहेत. जोर्पयत वरिष्ठांकडून आदेश येत नाही तोर्पयत दोन गेट सुरू ठेवणार आहोत, असे सहायक अभियंता वरुण जाधव यांनी सांगितले.
 

Web Title: 300 km of Tapi swells with water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.