तळवे येथे दोघांकडून ८० हजारांची वीज चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 11:41 AM2020-01-10T11:41:50+5:302020-01-10T11:41:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तळवे येथे दोन ठिकाणी वीज चोरी उघड झाली आहे. याप्रकरणी महावितरण कंपनीच्या फिर्यादीवरून ६७ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तळवे येथे दोन ठिकाणी वीज चोरी उघड झाली आहे. याप्रकरणी महावितरण कंपनीच्या फिर्यादीवरून ६७ हजार व १३ हजार रुपयांची वीज चोरी केल्याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
महावितरणतर्फे वीज चोरीविरुद्ध अक्कलकुवा येथे मोहिम उघडण्यात आली आहे. पथकाने तळवे, ता.तळोदा येथे तपासणी केली असता महेंद्र हिरालाल माळी यांनी त्यांच्या घरात वीज जोडणी घेतली आहे. दोन वर्षात माळी यांनी सहा हजार ७५ युनिट वीज चोरी केली. महावितरणचे सुमारे ६७ हजार ७८० रुपयांचे नुकसान केले. महेंद्र माळी यांच्याविरुद्ध अक्कलकुवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी घटना तळवे येथेच घडली. योगेश नारायण पाटील यांनी आपल्या घरात घेतलेल्या वीज जोडणीच्या माध्यमातून सात महिन्यात १३ हजार ४३० रुपयांची ६५१ युनिटची वीज चोरी केली. याबाबत गजानन कोष्टी यांच्या फिर्यादीवरून योगेश पाटील यांच्याविरुद्ध अक्कलकुवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.