नंदुरबारातील 31 हजार शेतकरी मदतनिधीच्या प्रतिक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 12:38 PM2018-09-26T12:38:33+5:302018-09-26T12:38:38+5:30

बोंडअळीची बाधा : शासनाकडून 29 कोटी रूपयांचा निधी रखडला

31 thousand farmers of Nandurbar await the relief fund | नंदुरबारातील 31 हजार शेतकरी मदतनिधीच्या प्रतिक्षेत

नंदुरबारातील 31 हजार शेतकरी मदतनिधीच्या प्रतिक्षेत

Next

नंदुरबार : जिल्ह्यात बोंडअळीमुळे 85 हजार शेतकरी बाधित झाले होत़े यातील 54 हजार 817 शेतक:यांना शासनाने मदत वाटप केली असल्याचा अहवाल प्रशासनाने दिला आह़े परंतू अद्यापही 31 हजार शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत असून गेल्या दोन आठवडय़ांपासून शासनाने जिल्हा प्रशासनाला 29 कोटी रूपयांची रक्कम वर्ग केलेली नसल्याने मदतीसाठी शेतकरी बँका आणि तहसीलदार कार्यालयांमध्ये चकरा मारत आहेत़
नंदुरबार जिल्ह्यातील शेतक:यांसाठी शासनाने 89 कोटी 65 लाख 22 हजार रूपयांची मदत जाहिर केली होती़ ही मदत जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त शेतक:यांना देण्यात येणार होती़ यानुसार गेल्या मे महिन्यापासून वाटपाचे कामकाज सुरू होत़े परंतू पाच महिने उलटूनही केवळ 54 हजार शेतक:यांनाच मदत मिळू शकलेली आह़े शासनाने दिलेला सर्व निधी वाटप झाल्यानंतर तात्काळ उर्वरित शेतक:यांसाठीचा निधी देणे गरजेचे असतानाही दोन आठवडे उलटूनही प्रशासनाला रक्कम प्राप्त झालेली नाही़ याचा परिणाम म्हणजे गेल्या दोन आठवडय़ांपासून शेतक:यांची फिरफिर सुरू झाली आह़ेबहुतांश शेतक:यांना मदत मिळाली असल्याने अनेकांनी तलाठी आणि तहसीलदार कार्यालयात तगादा लावला आह़े येत्या आठवडाभरात जिल्हाधिकारी कार्यालयात उर्वरित 31 हजार शेतक:यांसाठी जाहिर झालेली 29 कोटी 89 लाख 22 हजार 145 रूपयांची रक्कम मिळण्याची शक्यता वर्तवली जात आह़े परंतू ठोस अशी माहिती नसल्याने त्यापुढील आठवडा उजाडण्याची स्थिती निर्माण झाल्याची माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली आह़े जिल्ह्यात बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या 95 हजार 802 हेक्टर क्षेत्रापैकी 65 टक्के क्षेत्र हे कोरडवाहू असल्याने तेथील शेतक:यांचा गेल्या वर्षाचा खरीप हंगाम हाताच गेला होता़ 
यंदाही पावसाने मेहेरनजर न दाखवल्याने पुन्हा दुष्काळी स्थितीचा सामना शेतक:यांना करावा लागत आह़े यात शासनाकडून प्रतीहेक्टर मिळणारी 6 हजार 800 ही रक्कम दिलासा देणारी ठरणारी होती़ गत चार महिन्यात शेतक:यांना मिळालेल्या रकमेमुळे अनेकांनी पुन्हा शेतीतच गुंतवणूक करत कापूस लागवड केला होता़ परंतू गत दोन आठवडय़ात रकमेचे वाटप थांबल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत़ कार्यालये आणि बँकांमध्ये भेटी देणा:या शेतक:यांच्या प्रश्नांना उत्तरे देता-देता अधिकारी कर्मचा:यांच्या नाकीनऊ आले आह़े नंदुरबार तालुक्यात आजअखेरीस 16 हजार 719 शेतक:यांना 21 कोटी 85 लाख 6 हजार 754 रूपयांची मदत वाटप झाली आह़े तालुक्यात 10 कोटी 92 लाख 53 हजार 379 रूपयांचे वाटप शिल्लक आह़े
नवापूर तालुक्यात 9 हजार 271 शेतक:यांना 5 कोटी 16 लाख 47 हजार 324 रूपयांचे वाटप करण्यात आले आह़े याठिकाणी अद्यापही 2 कोटी 87 लाख 4 हजार 816 रूपयांची मागणी आह़े 
अक्कलकुवा तालुक्यात 2 हजार 69 शेतक:यांना आजवर 97 लाख 80 हजार 802 रूपयांच्या मदतीचे वाटप करण्यात आले आह़े येथे अद्याप 48 लाख 90 हजार 604 रूपयांच्या निधीची प्रतिक्षा आह़े 
सर्वाधिक 43 कोटी 92 लाख 49 हजार 618 मदत शहादा तालुक्यात जाहिर झाली होती़ यातील केवळ 29 कोटी 28 लाख 33 हजार 78 रूपये शासनाला प्राप्त झाले असून 24 हजार 159 शेतक:यांना ही मदत मिळाली आह़े या तालुक्यातून 14 कोटी 64 लाख 16 हजार 540 रूपयांची मागणी आह़े 
तळोदा तालुक्यात 2 हजार 107 शेतक:यांना 22 कोटी  49 लाख 94 रूपयांची मदत वाटप झाली असली तरी येथेही अद्याप 1 कोटी 12 लाख 45 हजार 48 रूपयांची गरज आह़े 
सर्वाधिक कमी 492 शेतकरी संख्या असलेल्या धडगाव तालुक्यात 22 लाख 39 हजार 640 रूपयांची मदत वाटप करण्यात आली आह़े येथे 12 लाख 41 हजार 960 रूपयांची गरज आह़े
 

Web Title: 31 thousand farmers of Nandurbar await the relief fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.