शहाद्यातील ३१ वर्षीय कोरोनाबाधित युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 12:41 PM2020-04-23T12:41:15+5:302020-04-23T12:42:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाचा संसर्ग झालेल्या शहादा येथील युवकाचा मृत्यू झाल्याची माहिती बुधवारी रात्री जिल्हाधिकारी यांनी दिली ...

31-year-old corona-affected youth dies | शहाद्यातील ३१ वर्षीय कोरोनाबाधित युवकाचा मृत्यू

शहाद्यातील ३१ वर्षीय कोरोनाबाधित युवकाचा मृत्यू

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाचा संसर्ग झालेल्या शहादा येथील युवकाचा मृत्यू झाल्याची माहिती बुधवारी रात्री जिल्हाधिकारी यांनी दिली आहे़ त्याच्यावर जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डात उपचार सुरु होते़
शहादा येथील बागवान गल्लीतील केळीच्या व्यापारी युवकास कोरोनाची लागण झाल्याचे मंगळवारी उशिरा स्पष्ट करण्यात आले होते़ त्याला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने जिल्हा रुग्णालयाच्या आयोसोलेश वॉर्डात दाखल करण्यात आले होते़ दाखल केल्यानंतर उपचार सुरु असताना अचानक त्याची प्रकृती खालावून बुधवारी रात्री त्याचा मृत्यू झाला़ यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून प्रशासनाकडून शहादा येथील विविध भाग सील करुन संबधित युवकाने व्यापारानिमित्त भेट दिलेल्या शहादा तालुक्यातील विविध गावांमध्ये संपर्कात आलेल्यांचा शोध सुरु करण्यात आला आहे़ त्यानुसार त्याठिकाणच्या पदाधिकारी व ग्रामसेवकांना सूचित करुन कारवाई सुरु झाली आहे़ मयत युवकावर त्याचे दोन नातेवाईक आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे़

Web Title: 31-year-old corona-affected youth dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.