नंदुरबार जिल्ह्यात 32 हजार 554 मतदारांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 05:34 PM2019-02-02T17:34:33+5:302019-02-02T17:34:54+5:30

नंदुरबार : अंतिम मतदार याद्या प्रसिद्धीनंतर जिल्ह्यात 32 हजार 554 नव्या मतदारांची भर पडली आहे. वाढलेल्या मतदारांमध्ये सर्वाधिक महिला ...

32 thousand 554 voters in Nandurbar district | नंदुरबार जिल्ह्यात 32 हजार 554 मतदारांची वाढ

नंदुरबार जिल्ह्यात 32 हजार 554 मतदारांची वाढ

Next

नंदुरबार : अंतिम मतदार याद्या प्रसिद्धीनंतर जिल्ह्यात 32 हजार 554 नव्या मतदारांची भर पडली आहे. वाढलेल्या मतदारांमध्ये सर्वाधिक महिला मतदारांचा समावेश आहे. इतर दोन मतदारांचीही त्यात भर पडली आहे. आता जिल्ह्यात एकुण 12 लाख दोन हजार 426 मतदार आहेत. दरम्यान, नव्याने मतदार नोंदणी व मतदार याद्यांमधील दुरूस्तीची प्रक्रिया यापुढेही सुरूच राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी दिली. 
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. त्यानुसार 31 जानेवारी रोजी अंतिम मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या. या याद्यांची प्रसिद्धी तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी लावण्यात आल्या आहेत. 
नंदुरबार मतदारसंघात सर्वाधिक
नवीन मतदार याद्यांनुसार नंदुरबार विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदार राहणार आहेत. पूर्वी या मतदारसंघात एकुण तीन लाख 23 हजार 706 मतदार होते. आता तीन लाख 32 हजार 261 मतदार आहेत. त्यात एक लाख 67 हजार 386 पुरुष तर एक लाख 64 हजार 869 महिला मतदार आहेत. इतर दोन मतदार देखील यात आहेत. वाढलेल्या मतदार यादीत एकुण आठ हजार 555 मतदार वाढले आहेत. त्यात चार हजार 36 पुरुष तर चार हजार 519 महिला मतदारांचा समावेश आहे.
शहादा मतदार संघात पूर्वी तीन लाख दोन हजार 501 मतदार होते. आता तीन लाख 13 हजार 546 मतदार असतील. त्यात एक लाख 58 हजार 423 पुरुष तर एक लाख 55 हजार 119 महिला मतदार आहेत. इतर चार मतदारांचा देखील समावेश आहे. वाढलेल्या मतदार एकुण 11 हजार 45 आहेत. त्यात पाच हजार 208 पुरुष तर पाच हजार 835 महिला मतदार आहेत. इतर दोन मतदारांचाही समावेश आहे.  
अक्कलकुवा मतदार संघात पूर्वी दोन लाख 65 हजार 106 मतदार होते. आता दोन लाख 72 हजार 972 मतदार राहणार आहेत. त्यात एक लाख 37 हजार 522 पुरुष तर एक लाख 35 हजार 449 पुरुष आणि एक इतर मतदार यांचा समावेश आहे. वाढलेले एकुण मतदार सात हजार 865 इतके आहेत. यात तीन हजार 941 पुरुष तर तीन हजार 924 महिला मतदार आहेत. 
नवापूर मतदार संघात पूर्वी दोन लाख 78 हजार 558 मतदार होते. आता दोन लाख 83 हजार 647 मतदार असतील. त्यात एक लाख 38 हजार 700 पुरुष तर एक लाख 44 हजार 946 महिला मतदार व एक इतर मतदार आहे. वाढलेल्या मतदारांमध्ये एक हजार 931 पुरुष तर तीन हजार 158 महिला असे एकुण पाच हजार 89 मतदारांचा समावेश आहे. 
 

Web Title: 32 thousand 554 voters in Nandurbar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.