नवापूर येथील ठेकेदारास 32 हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 01:08 PM2018-03-21T13:08:27+5:302018-03-21T13:08:27+5:30
व्यापारी गाळे बांधकामात हलगर्जीपणा
लोकमत ऑनलाईन
नवापूर, दि़ 21 : शासकीय योजनेतून उभारण्यात येणा:या व्यापारी गाळे बांधकामात हलगर्जीपणा केल्याने ठेकेदाराला 32 हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे. लोकशाही दिनात झालेल्या तक्रारीची दखल घेत नवापूर पालिकेने हा निर्णय घेतला आहे.
नवापूर नगर पालिकेच्या वैशिष्टपूर्ण योजने अंतर्गत नारायण पूर रोड लगत सुरु असलेल्या आरक्षण क्रमांक 66 मधील बाजार भवन बांधकामाची सुरुवात डिसेंबर 2014 मध्ये करण्यात आली. कामाची मुदत आठ महिने असताना ठेकेदाराने दोन वर्षात काम पूर्ण न केल्याची तक्रार तालुका लोकशाही दिनात सामाजिक कार्यकर्ते मंगेश येवले यांनी 2016 मध्ये केली होती. कामाबाबत ठेकेदाराला अनेक वेळा मुदत वाढ देऊनही काम पूर्ण होत नसल्याचे त्यांनी प्रशासनाच्या लक्षात आले होत़े पालिका प्रशासनाने ही बाब पालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठेऊन कारवाई करण्यासाठी परवानगी मागितली असता सत्ताधारी गटाकडून शासकीय दंड आकारून ठेकेदारास मुदत वाढ देण्यासंबंधी विषय मांडुन कारवाईच्या सूचना करण्यात आल्या. त्या नुसार प्रशासनाकडुन ठेकेदाराने विहित मुदतीत वाढ देऊनही या कामात हलगर्जी पणा केल्याचा ठपका ठेवत 32 हजार रुपये दंड आकारण्यात आला.
लोकशाही दिनात झालेल्या तक्रारीची दखल घेतल्याची नवापुर तालुक्यातील ही पहिलीच घटना असल्याने नागरिकांनी लोकशाही दिनात मिळालेला न्याय व कारवाई बाबत समाधान व्यक्त केले आहे.