ग्रामीण पाणीपुरवठय़ाला 33 कोटींचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 11:47 AM2019-09-01T11:47:09+5:302019-09-01T11:47:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ग्रामीण पाणीपुरवठा व अन्य विकास कामांसाठी शासनाने जिल्ह्याला चौदाव्या वित्त आयोगांतर्गत 33 कोटी 54 ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : ग्रामीण पाणीपुरवठा व अन्य विकास कामांसाठी शासनाने जिल्ह्याला चौदाव्या वित्त आयोगांतर्गत 33 कोटी 54 लाख 75 हजारांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे ग्रामीण पाणीपुरवठय़ाच्या प्रलंबित कामांना गती दिली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ग्रामीण भागाच्या विकासात पाणी पुरवठा हा महत्वाचा मुद्दा ठरतो, दुष्काळी परिस्थिती व पाणी पुरवठय़ाच्या अन्य समस्यांवर मात करण्यासाठी विविध उपाय योजना होणे अपेक्षित आहे. सुरळीत पाणी पुरवठा होऊन प्रत्येक नागरिकाला हक्काचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी चौदाव्या वित्त आयोगांतर्गत निधी उपलब्ध करुन देण्याची शिफारस केंद्र शासनाने राज्य शासनाकडे केली. त्यानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना 25 टक्के अनुदानाचा पहिला हप्ता उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यात नंदुरबार जिल्ह्यातील कामांना गती देण्यासाठी 33 कोटी 54 लाख 75 हजाराचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
नंदुरबार जिल्ह्याला प्राप्त झालेल्या निधीतून ग्रामीण भागातील पाणी पुरवठय़ाच्या कामांना गती देण्यात येणार आहे. श्विाय पाणी पुरवठा विभागामार्फत प्रलंबित राहिलेली वीजबिले अदा करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहे. यासह ग्रामीण भागातील थकित वीज बिले, पथदिव्यांची बिलांची प्रतीपूर्ती केली जाणार असल्याचे सागण्यात येत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषदेंतर्गत प्रलंबित व नवीन कामेही हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रखडलेली व प्रलंबित राहिलेल्या कामांसह नवीन कामांना गती दिली जाईल अशी अपेक्षा ग्रामीण भागातून व्यक्त केली जात आहे.
चौदावा वित्त आयोगांतर्गत प्राप् झालेला निधी खर्च करण्याचा संपूर्ण अधिकार ग्रामसभेला देण्यात आला असून या निधीची लवकरच तपासणी केली जाणार असल्याचे निर्देश राज्य शासनाने शासन निर्णयाद्वारे दिले आहेत.