33 बालकांच्या चेह:यावर ‘मुस्कान’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 05:29 PM2017-08-03T17:29:12+5:302017-08-03T17:34:38+5:30
नंदुरबार पोलिसांनी घेतला हरविलेले, बालकामगार तसेच अपहरण झालेल्या बालकाचा शोध
ऑनलाईन लोकमत नंदुरबार, दि.3 - जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्ह्यात ऑपरेशन मुस्कान राबवले जात आह़े यांतर्गत 2017 मध्ये जिल्ह्यात तब्बल 33 बालकांची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आह़े पोलीस दलाकडून 2014 पासून घरापासून दुरावलेले, हरवलेले आणि बालमजुरीच्या जोखडात अडकून पडलेल्या बालकांच्या सुटकेसाठी ऑपरेशन मुस्कान सुरू करण्यात आले आह़े याअंतर्गत गेल्या तीन वर्षात पोलीस दलाकडून जिल्ह्यातील अनेक बालकांना मुख्य प्रवाहात आणले. जानेवारी महिन्यापासून सुरू असलेल्या या अभियानात पथकांनी जिल्ह्यातील बसस्थानक, रेल्वेस्थानक, धार्मिक स्थळे, हॉटेल्स, ढाबे याठिकाणी भेटी देऊन तेथे काम करणा:या मुलांची चौकशी केली होती़ यातून आठ मुले आणि आठ मुली ह्या पळवून आणलेल्या असल्याचे लक्षात असल्यानंतर त्यांच्या पालकांचा शोध घेत त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात आल़े मुस्कानअंतर्गत नंदुरबार शहर, नवापूर, शहादा, तळोदा व अक्कलकुवा या शहरांमध्ये स्थानिक गुन्हा शाखेचे पथक व जिल्हा बाल संरक्षण कक्ष महिला बालविकासचे अधिकारी यांच्यासह स्थानिक पोलिसांनी घेतलेल्या शोध कार्यात 17 अल्पवयीन मुले-मुली भिक मागताना, बालकामगार म्हणून काम करताना आढळून आल्याने त्यांचे समुपदेशन करून त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले आह़े स्थानिक गुन्हा शाखेच्या विशेष पथकाने 14 अल्पवयीन मुला मुलींचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या ताब्यात दिले होत़े पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत वाघुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गिरीश पाटील, दीपक बुधवंत, पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे, पोलीस निरीक्षक विजयसिंग परदेशी, सहायक पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांच्यासह विविध पोलीस ठाण्याचे कर्मचारी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष महिला बाल विकास कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी पी़बी़देवरे, संरक्षण अधिकारी मिनाक्षी कोळी, बालकल्याण समितीचे अध्यक्ष ईश्वर धामणे यांनी काम पाहिल़े पालकांच्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न पोलीस दल ‘मुस्कान’च्या माध्यमातून करत आह़े हे एक सामाजिक कार्य आह़े यापुढेही जिल्ह्यातून हरवलेल्या आणि बालकामगार म्हणून काम करणा:यांची सुटका करण्यावर भर राहील़ -राजेंद्र डहाळे, पोलीस अधीक्षक, नंदुरबाऱ