Vidhan Sabha 2019: 3,497 शाईच्या बाटल्यांचा होणार वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 12:35 PM2019-10-18T12:35:45+5:302019-10-18T12:41:01+5:30

मनोज शेलार ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील चारही मतदारसंघात मतदानासाठी एकुण तीन हजार 497 शाईच्या बाटल्या लागणार ...

3,497 ink bottles to be used | Vidhan Sabha 2019: 3,497 शाईच्या बाटल्यांचा होणार वापर

Vidhan Sabha 2019: 3,497 शाईच्या बाटल्यांचा होणार वापर

Next

मनोज शेलार । 
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील चारही मतदारसंघात मतदानासाठी एकुण तीन हजार 497 शाईच्या बाटल्या लागणार आहेत. प्रशासनाचे मागणी केल्यानुसार शाईच्या बाटल्या उपलब्ध झाल्या आहेत. दरम्यान सर्वात जास्त 967 बाटल्या नंदुरबार तर सर्वात कमी 794 बाटल्या अक्कलकुवा मतदारसंघाला लागणार    आहेत.    
मतदान केल्याची निशानी दाखविण्यासाठी तजर्णीला लावलेली शाईची रेष दाखवून अनेकांना सेल्फी किंवा फोटो काढून तो सोशल मिडियावर टाकण्याची भारी हौस असते. परंतु ही शाई कशी येते, विशिष्ट बोटालाच का लावली जाते, किती लिटर शाई येते, तिचा वापर किती दिवसापुरता होऊ शकतो याची माहिती मात्र, सामान्य मतदाराला नसते. या शाईची मोठी रंजक कहानी देखील आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील चार मतदारसंघात एकुण 34 लिटर 970 मि.ली. शाई लागणार आहे. ती उपलब्ध देखील झाली आहे.
एका बाटलीत दहा मि.ली.
मतदानासाठी वापरण्यात येणा:या एका शाईच्या बाटलीत दहा मिलिलिटर शाई असते. एका मतदान केंद्रात किमान एक  तर जास्तीत जास्त तीन बाटल्या द्याव्या लागतात. अर्थात मतदारांची संख्या त्या केंद्रावर किती यावरून शाईच्या बाटल्यांची संख्या देखील ठरविली जाते. दहा मि.ली.ची एक बाटली सांभाळण्याची कसरत मात्र निवडणूक कर्मचा:याला करावी लागते. 
तजर्नीला उभी रेष
मतदान करण्यासाठी आलेल्या मतदाराला डाव्या हाताच्या आधी तजर्नीला नखावर अर्धी आणि त्यावरील भागात अर्धी अशी रेष मारावी लागते. पूर्वी केवळ ठिपका ठेवला जात होता. परंतु 2006 नंतरच्या सर्व निवडणुकांमध्ये ठिपका ऐवजी रेष स्वरूपात शाई लावली   जात आहे. यामुळे ती पुसण्याचा संभव    नसतो.
आवश्यकतेपेक्षा अधीक मागणी
मतदार संख्या लक्षात घेवून किती शाईच्या बाटल्या लागतील याचा अंदाज बांधला जातो. त्यापेक्षा दहा टक्के अधीक शाईच्या बाटल्यांची मागणी नोंदविली जाते किंवा संबधीत विभाग थेट पाठवून देत   असतो. 
मतदानाच्या वेळी शाईची बाटली पडणे, शाई सांडणे किंवा इतर कारणामुळे शाई    वाया गेल्यास लागलीच पर्यायी शाईची बाटली उपलब्ध व्हावी हा त्यामागचा उद्देश असतो. परंतु शाई वाया गेल्यास व दुसरी बाटली मागविल्यास संबधीत कर्मचा:याला अनेक बाबींचा खुलासा करावा लागत   असतो.   


बाटलीमधील शाई किमान 24 तास ओली असते. त्यानंतर ती सुकण्यास सुरुवात होते. त्यामुळे एकदा फोडलेली शाईची बाटलीमधील शाई दुस:यांदा  उपयोग करता येण्याजोगी नसते. किमान 15 व जास्तीत जास्त 30 टक्के शाई वाया जात असते. याला कारण मतदानाची टक्केवारी. जितके जास्त मतदान तेवढय़ा जास्त शाईचा वापर होत असतो.

मतदान केंद्रावर मतदाराची ओळख पटविल्यानंतर त्याला प्रवेश दिला जातो. प्रत्यक्ष मतदानापूर्वीच मतदाराच्या डाव्या हाताच्या तजर्नीवर शाई लावली जाते. त्यानंतर मतदाराची स्वाक्षरी किंवा अंगठा घेतला जातो. जर तजर्नीवर शाई लागलेली असेल तर त्या मतदाराला मतदान करू दिले जात नाही. निवडणूक कर्मचा:याला शाई अधीक जपून वापरावी लागत    असते.  


 12,24,429 मतदारांना 34 लिटर 970 मि.ली. इतकी लागणार शाई
4एका बाटलीत 10 मि.ली.इतकी  शाई असते. एका बाटलीतून किमान 350 जणांच्या बोटाला शाई पुरेल असे गणित असते. ही बाब लक्षात घेता 12 लाख 24 हजार 429 एवढय़ा मतदारांना 3,497 शाईच्या बाटलीमधील 34 लिटर 970 मि.ली. इतकी शाईचा उपयोग केला जाणार आहे. संपूर्ण देशात मतदानाच्या वेळी म्हैसूरची शाई वापरण्यात येते. येथील एका वॉर्निश कंपनीमध्ये ती तयार होते. या कंपनीपासून जगातील 25 देशांना निवडणूक शाईचा पुरवठा केला जातो.
 

अक्कलकुवा मतदारसंघात एकुण 349 मतदान केंद्रांवरून 2,77,917 मतदार आपला हक्क बजावणार आहेत. या मतदारांसाठी एकुण 794 शाईच्या बाटल्या लागणार आहेत. 
शहादा मतदारसंघात 3,20,273 मतदारांकरीता 339 मतदान केंद्रांची सोय करण्यात आली आहे. या मतदारसंघात एकुण 915 शाईच्या बाटल्या लागणार आहेत. 
नंदुरबार मतदारसंघात मतदारसंख्या सर्वाधिक 3,38,625 मतदारांसाठी 361 मतदान केंद्रांची सोय करण्यात आली आहे. या मतदान केंद्रांवर एकुण 967 शाईच्या बाटल्या पुरविण्यात येणार आहेत.
नवापूर मतदारसंघात 2,87,614 मतदार आहेत. या मतदारांकरीता एकुण 336 मतदान केंद्रांची सोय करण्यात आली असून या ठिकाणी 821 शाईच्या बाटल्या पुरविण्यात येणार आहेत. 
 

Web Title: 3,497 ink bottles to be used

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.