बसेस एकमेकांवर धडकून 37 प्रवासी जखमी
By admin | Published: July 5, 2017 01:01 PM2017-07-05T13:01:48+5:302017-07-05T13:01:48+5:30
ठाणेपाडा गावाजवळील घटना : जखमींवर नंदुरबार येथे उपचार
Next
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार,दि.5-साक्री ते नंदुरबार रस्त्यावर ठाणेपाडा गावाजवळ दोन बसेसची समोरासमोर धडक होऊन 37 प्रवासी जखमी झाल़े ही घटना मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली़ अपघातात एक प्रवासी गंभीर जखमी झाला आह़े
मंगळवारी दुपारी नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा गावाजवळील वनविभागाच्या रोपवाटिकेच्या पुढे वळणावर वडाच्या झाडाजवळ नंदुरबार आगाराची बस एमएच 20- बीएल 9517 साक्रीकडे जात होती़ याचदरम्यान नाशिक-नंदुरबार बस क्रमांक एमएच 14-बीटी 4504 आली़ वळणावर आलेल्या या बसने साक्री बसला थेट धडक दिल्याने मोठा आवाज झाला़ समोरून धडकलेल्या दोन्ही बसच्या काचा रस्त्यावर पडल्या, तर आतील प्रवासी जखमी झाल़े
या धडकेत दोन्ही बसमधील संजय दामोदर ओगले, सुकलाल ब्रिजलाल ठाकरे, इंदूबाई भीमराव महिरे, भगवान श्रीपत सोनवणे, शेख बिलाल मुस्तफा, अब्दुल्ला शेख, मोहम्मद जावेद अब्दुल रशीद, दिनेश नाना, योगिता रमेश अहिरे, रामकृष्ण लकडू लोहार, सुनील चिंधू ठाकरे, सुकलाल शिवाजी सोनवणे, स्वपAील संतोष पटेल, दिव्या संतोष पटेल, सागर संजय सामुद्रे, अब्दुल कादिर शकूर रंगरेज, संजय भाईदास पाटोळे, मनेश दिवाल्या राऊत, प्रकाश रामसिंग वसावे, शेख जावेद अब्दुल रशीद, रंगरेज अब्दुल कादिर, शरद मोहन मुसळदे, ब्रिजलाल सुन्या ठाकरे, राज जितेंद्र चौधरी, नरेंद्र बाबूराव मराठे, दिनेशपुरी गोसावी, समाधान हिरामण सोनवणे, सुभद्राबाई दामोदर ओगले, निशाबाई संजय ओगले, योगिता संजय ओगले, ललित संजय ओगले, बसचालक बबन दत्तात्रय खैरनार असे एकूण 37 प्रवासी जखमी झाल़े
संजय ओगले यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून नाशिक-नंदुरबार बसचा चालक बबन दत्तात्रय खैरनार, रा़सटाणा याच्याविरोधात नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े