लॉकअपमधून ४ संशयित आरोपी फरार, पोलीस ठाण्यात उडाली खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 13:29 IST2022-12-05T13:27:40+5:302022-12-05T13:29:27+5:30
आरोपींनी खिडकीतुन उड्या मारत चड्डी बनीयनवरच पोबारा केला. लगतच्या ऊसांच्या शेतामधून ते फरार झाल्याची माहिती आहे.

लॉकअपमधून ४ संशयित आरोपी फरार, पोलीस ठाण्यात उडाली खळबळ
नंदुरबार/मनोज शेलार
नंदुरबार : जिल्ह्यातल्या नवापुर पोलीस स्टेशनच्या लॉकअप मध्ये अटकेत असलेले चार संशयित आरोपी लॉकअपच्या खिडक्या तोडुन फरार झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. दरोड्याच्या आरोपाखाली या चार संशयीतांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांना पुरुष लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र, लॉकअपच्या मागच्या भिंतीला असलेल्या खिडकीची गज तोडुन ते संशयीत आरोपी फरार झाले आहेत.
आरोपींनी खिडकीतुन उड्या मारत चड्डी बनीयनवरच पोबारा केला. लगतच्या ऊसांच्या शेतामधून ते फरार झाल्याची माहिती आहे. पोलीस त्यांच्या मागावर असुन ज्या शेतात आरोपी फरार झाले आहेत. त्या शेताला पोलीसांनी विळाखा देखील टाकला आहे. पोलिसांनी जिल्हाभरात नाकेबंदी वाढवली असून शोधण्याची मोहिम सुरू रआहे. याबाबत पोलीस दलातील कोणताही अधिकारी बोलण्यास तयार नाही.