21 हजार विद्याथ्र्यासाठी 40 केंद्र

By admin | Published: March 7, 2017 12:23 AM2017-03-07T00:23:40+5:302017-03-07T00:23:40+5:30

दहावी परीक्षा : कॉपी रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमे:यांचीही घेणार मदत

40 centers for 21 thousand students | 21 हजार विद्याथ्र्यासाठी 40 केंद्र

21 हजार विद्याथ्र्यासाठी 40 केंद्र

Next

नंदुरबार : जिल्ह्यातील 40 परीक्षा केंद्रांमधून 21 हजार 383 विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत. त्यासाठीची तयारी माध्यमिक शिक्षण विभागाने पूर्ण केली आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रशासन सरसावले असून विविध उपाययोजनादेखील करण्यात आलेल्या आहेत. काही ठिकाणी सीसीटीव्हीचीदेखील निगराणी राहणार आहे.
दहावीच्या परीक्षांना मंगळवार, 7 मार्चपासून सुरुवात होत आहे. त्यासाठीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. यंदादेखील कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा व्हाव्या यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना केलेल्या आहेत. त्यासाठी प्रसंगी कठोर भूमिकादेखील घेण्यात येणार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या आठवडय़ापासून सुरू झालेल्या बारावी परीक्षादेखील सुरळीत सुरू असल्यामुळे दहावीच्या परीक्षादेखील त्याच मुक्त आणि कॉपीविरहित वातावरणात पार पडतील अशी अपेक्षा माध्यमिक शिक्षण विभागातर्फे व्यक्त करण्यात आली आहे.
तालुकानिहाय परीक्षार्थी
जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 21 हजार 383 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले आहेत.  त्यांच्याकरिता एकूण 40 परीक्षा केंद्रांची सोय करण्यात आली आहे. तालुकानिहाय परीक्षार्थी व त्यांच्यासाठी असलेल्या परीक्षा केंद्रांची संख्या पुढीलप्रमाणे- नंदुरबार तालुक्यातून एकूण सहा हजार 59 विद्यार्थी परीक्षेला बसले असून 13 परीक्षा केंद्र राहणार आहेत. नवापूर तालुक्यातून चार हजार 26 विद्यार्थी परीक्षा देणार असून त्यांच्यासाठी     नऊ केंद्रांची सोय करण्यात आली आहे.
शहादा तालुक्यात सर्वाधिक पाच हजार 243 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यांच्यासाठी 19 परीक्षा केंद्र राहणार आहेत. तळोदा तालुक्यात  दोन हजार 29 विद्यार्थी असून तीन परीक्षा केंद्र राहणार आहेत. अक्कलकुवा तालुक्यात दोन हजार 492 विद्यार्थी असून त्यांच्याकरिता तीन परीक्षा केंद्र व धडगाव तालुक्यासाठी 1534 विद्यार्थी प्रविष्ट असून तेथेही तीन परीक्षा केंद्र कार्यान्वित राहणार आहेत.
भरारी पथके
दहावीच्या परीक्षेसाठी सहा तालुक्यांसाठी सहा भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. याशिवाय शिक्षणाधिकारी यांच्यासह त्या त्या तालुक्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार हेदेखील वेळोवेळी परीक्षा केंद्रांना भेटी देऊन पाहणी करणार आहेत. तसेच प्रत्येक केंद्रावर एक बैठे पथकदेखील कार्यान्वित राहणार आहे. आधीच बारावी परीक्षेसाठीदेखील पथके तयार करण्यात आलेली आहेत.
मनाई आदेश
परीक्षा केंद्र परिसराच्या 200 मीटरच्या आत मनाई आदेश यापूर्वीच लागू करण्यात आले आहेत. परीक्षार्थ्ीशिवाय इतर कुणालाही त्या परिसरात प्रवेश करण्यास बंदी राहणार आहे. याशिवाय परिसरातील ङोरॅाक्स सेंटरदेखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
सीसीटीव्हीचा वॉच
अनेक शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आलेले आहेत. त्यामुळे कॉपी रोखण्यासाठी त्यांचाही आधार घेतला जाणार आहे. बाहेरून कॉपी पुरविणा:यांचा त्रास यामुळे कमी होण्याची शक्यता आहे. शाळेच्या आतमध्ये असलेल्या कॅमे:यांची दिशा बाहेरच्या बाजूला बदलवून बाहेरून कॉपी पुरविणा:यांच्या समस्येवर उपाय केला जाणार आहे. तशा सूचना ज्या शाळेत सीसीटीव्ही लावण्यात आले आहे त्या शाळांना देण्यात आल्या आहेत.
काही परीक्षा केंद्रांमध्ये  समस्यांचा त्रास विद्याथ्र्याना           सहन करावा लागणार आहे. बसण्यासाठी बाकांची पुरेशी आणि व्यवस्थित व्यवस्था नसणे, वर्गामध्ये पंख्याची सोय नसणे, पिण्याचे पाणी यासह इतर समस्या राहण्याची शक्यता आहे.
परीक्षा केंद्रांच्या परिसरात बाहेरून कॉपी पुरविणा:यांचा मोठय़ा प्रमाणावर त्रास होतो. केंद्र व्यवस्थापन, कर्मचा:यांसह विद्यार्थीही अशा प्रकारांमुळे हैराण होतात. त्यामुळे बाहेरून कॉपी पुरविणा:यांना प्रतिबंध करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Web Title: 40 centers for 21 thousand students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.