40 कोटींचा अर्थसंकल्प मंजुर : नंदुरबार जिल्हा परिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 12:05 PM2018-03-15T12:05:43+5:302018-03-15T12:05:43+5:30
पंचवार्षीकमधील शेवटचा अर्थसंकल्प
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार : जिल्हा परिषदेचा चालू पंचवार्षिकमधील शेवटचा अर्थसंकल्प बुधवारी सादर करण्यात आला. 40 कोटी 63 लाख रुपये एकुण खर्चाच्या अंदाजपत्रकात जिल्हा परिषदेच्या उत्पन्न वाढीसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषदेची विशेष सभा अध्यक्षा रजनी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी घेण्यात आली. यावेळी अर्थ समिती सभापती दत्तू चौरे यांनी 2018-19 या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सादर केले. यावेळी उपाध्यक्ष सुहास नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांच्यासह सभापती व अधिकारी उपस्थित होते.
यंदाचे अंदाजपत्रक 40 कोटी 63 लाख रुपयांचे आहे. त्यात 20 टक्के समाज कल्याण विभागास मुळ तरतूद सव्वा कोटी रुपयांची उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने मागासवर्गीयांच्या वैयक्तिक लाभाच्या कल्याणकारी योजनांवर विशेष भर देण्यात आलेला आहे. 10 टक्के महिला व बालकल्याण विभागास मुळ तरतूद 75 लाख रुपये उपलब्ध करण्यात आली आहे. महिलांच्या वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. अपंग कल्याणसाठी 33 लाख रुपये तर जलयुक्तसाठी एक कोटी 50 लाख रुपये तरतूद करण्यात आली आहे. शेतक:यांच्या सर्वागीन विकासाकरीता कृषी विभागास एक कोटी 30 लाख रुपयांचा खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. रस्ते परिक्षणासाठी सात कोटी 30 लाख रुपये तर पदाधिकारी व सदस्य यांचे मानधन, वाहन इंधन, दुरूस्तीसाठी पाच कोटी 15 लाख रुपयांची तरतूद आहे.
वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये लाभाथ्र्याचा हिस्सा समाविष्ट केल्यास योजना प्रभावीपणे राबविणे शक्य होईल. त्यादृष्टीने जिल्हा परिषदेच्या अनुदानातून सर्व विभागांनी वैयक्तिक लाभाच्या योजना राबवितांना मागासवर्गीय लाभाथ्र्यासाठी 90 टक्के अनुदानावर व सर्वसाधारण लाभाथ्र्यासाठी 75 टक्के अनुदानावर योजना राबविण्याचा निर्णय देखील घेण्यात आला असल्याचे अर्थ समिती सभापती दत्तू चौरे यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, डिसेंबर महिन्यात जिल्हा परिषदेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे यंदाच्या पंचवार्षीकमधील शेवटचा अर्थसंकल्प होता.