नंदुरबार जिल्ह्यातील 41 हजार शेतक:यांना कजर्माफीची शक्यता
By admin | Published: June 13, 2017 01:23 PM2017-06-13T13:23:44+5:302017-06-13T13:23:44+5:30
शासनाच्या घोषणेनंतर बँकांना आदेशाची प्रतीक्षा : जिल्ह्यातील शेतक:यांमध्ये समाधान
Next
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार,दि.13 : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि नंदुरबार जिल्ह्यातील 106 राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा यातून पीककर्ज घेतलेल्या 41 हजार अल्पभूधारक शेतक:यांचे कर्ज माफ होण्याची शक्यता आह़े संबंधित सर्व बँका सोमवारी शासनाच्या आदेशांची प्रतीक्षेत होत्या़
राज्य शासनाने कजर्माफीची घोषणा केल्यानंतर जिल्ह्यातील शेतक:यांनी आनंदोत्सव साजरा केला होता़ या पाश्र्वभूमीवर सोमवारी सहकारी आणि राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांकडून कृषी विभाग, पीककर्ज विभागाचे अधिकारी बैठका घेऊन आकडेवारी गोळा करत होत़े अग्रणी बँकेच्या अधिका:यांमार्फत गोळा केलेली आकडेवारी राज्यशासनाकडे पाठवणार असल्याची माहिती देण्यात आह़े जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांच्या तब्बल 106 शाखांमधून 22 हजार शेतकरी सभासद आहेत़ सहकारी संस्था आणि वैयक्तिक अशा स्वरूपात त्यांनी लाभ घेतला आह़े
23 कोटींच्या कर्जाचे वाटप
जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतक:यांची बँक असलेल्या धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने नंदुरबार जिल्ह्याच्या 30 शाखांमार्फत गेल्यावर्षी 19 हजार 944 शेतकरी सभासदांना 127 कोटी रुपयांचे खरीप पीककर्ज दिले गेले होत़े 31 मार्च 2017 र्पयत 5 हजार 446 शेतक:यांनी 31 कोटी 23 लाख परत करून कजर्फेड केल्याने ते पुन्हा कर्जासाठी पात्र ठरले होत़े तर 14 हजार 498 शेतक:यांकडे 68 कोटी 6 लाख थकबाकी होती़ शासनाने सरसकट कजर्माफी दिल्याने 19 हजार 944 शेतकरी कजर्माफीसाठी पात्र असल्याची माहिती जिल्हा बँकेकडून देण्यात आली आह़़े पाच हजार 446 शेतक:यांपैकी जिल्हा बँकेने तीन हजार 548 शेतक:यांना 23 कोटी 12 लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आह़े कजर्माफीच्या घोषणेमुळे कजर्वाटप तूर्तास थांबवण्यात आले आह़े