51 ग्रामपंचायतीसाठी 411 नामनिर्देशन माघारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 01:05 PM2017-09-28T13:05:35+5:302017-09-28T13:05:35+5:30

नऊ ग्रामपंचायती बिनविरोध : लोकनियुक्त सरपंच पदासाठी 96 उमेदवार रिंगणात

411 nominations for 51 gram panchayats withdrawal | 51 ग्रामपंचायतीसाठी 411 नामनिर्देशन माघारी

51 ग्रामपंचायतीसाठी 411 नामनिर्देशन माघारी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर/अक्कलकुवा/शहादा/ नंदुरबार : जिल्ह्यातील 51 ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि सदस्यपदासाठी दाखल 1 हजार 450 पैकी 411 नामनिर्देशन मागे घेण्यात आल़़े बुधवारी माघारीची अंतिम मुदत असल्याने तहसील कार्यालयांमध्ये गर्दी झाली होती़ 9 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याऩे जिल्ह्यात 42 ग्रामपंचायतींच्या 161 प्रभागातील 453 सदस्यपदासाठी एकूण एक हजार 47 उमेदवार रिंगणात आहेत़ यात 912 सदस्य तर सरपंच पदासाठी 135 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत़ 
जिल्ह्यात 51 ग्रामपंचायतींसाठी  1 हजार 219 तर 52 लोकनियुक्त सरपंच पदासाठी 231 इच्छुकांचे नामनिर्देशन दाखल होत़े यात केवळ 25 नामनिर्देशन सोमवारी बाद ठरवण्यात आले होत़े  नामनिर्देशन दाखल करण्याच्या अंतिम मुदतीत नवापूर तालुक्यात गंगापूर, वाटवी, पाडळदे ता़ शहादा, करणखेडा, सातुर्के, ओसर्ली आणि कानळदा ता़ नंदुरबार व सोरापाडा ता़ अक्कलकुवा या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत़ दुपारी तीन वाजेर्पयत अर्ज माघारी घेतले गेल्याने तात्काळ निवडणूक चिन्ह वाटपाला सुरूवात करण्यात आली होती़ उमेदवारांनी चिन्ह घेत सायंकाळपासून प्रचाराला सुरूवात केली होती़ 
 

Web Title: 411 nominations for 51 gram panchayats withdrawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.