435 लाभार्थीचे तेलपंप जीएसटीमुळे अडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 12:43 PM2018-08-27T12:43:40+5:302018-08-27T12:43:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
वाण्याविहिर : नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी शेतक:यांसाठी राबवली जाणारी 100 टक्के अनुदानावरील तेलपंप वाटप योजना फसवी ठरत आह़े तळोदा प्रकल्प कार्यालयाने निधी कृषी विभागाकडे दिला आह़े निधी मिळाल्यानंतर पंप खरेदी करून देण्याची गरज असताना कृषी विभाग शेतक:यांना जीएसटीसह तेलपंप खरेदी करण्याची सक्ती करत आहेत़ यामुळे एकाही लाभार्थीला लाभ झालेला नाही़
आदिवासी विकास विभागाच्या तळोदा प्रकल्पांतर्गत आदिवासी विकास महामंडळाकडून 100 टक्के अनुदानावर 2015-16 मध्ये 132 तर 2016 -17 मध्ये 435 लाभार्थी शेतक:यांना तेलपंप मंजूर करण्यात आले होत़े यासाठी मार्च 2018 मध्ये प्रकल्प कार्यालयाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे निधी वर्ग केला होता़ यानंतर संबधित अधिका:यांनी एप्रिल महिन्यात तालुकास्तरावर कृषी कार्यालयाला निधी वितरीत केला होता़ परंतू हा निधी देऊनही लाभार्थी शेतकरी तेलपंपापासून वंचित आहेत़ मंजूर आदिवासी लाभार्थी शेतक:यांना जीएसटी बिलासह तेलपंप खरेदी करून ते संबधित विभागाकडे सादर करण्याची अट घालण्यात आल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े
लाभार्थी शेतक:यांकडे तेलपंप खरेदी करण्यासाठी एवढे पैसे नसल्याने त्यांच्याकडून तेलपंप खरेदी होणे शक्यच नाही़ यातही 18 टक्के जीएसटी आणि त्याहून अधिक वाहतूक खर्च यामुळे शेतकरी चिंतेत आहेत़ शेतक:यांनी याबाबत प्रकल्प कार्यालयाकडे पाठपुरावा केल्यानंतर ते कृषी विभागाकडे बोट दाखवत आहेत़
कृषी विभाग जीएसटी बिलासह तेलपंप खरेदी करा, अन्यथा लाभ सोडा अशी हेटाळणी करत असल्याचे लाभार्थीचे म्हणणे आह़े
तळोदा प्रकल्पांतर्गत 2015 -16 मध्ये तळोदा 20, धडगांव 20 आणि अक्कलकुवा तालुक्यातील 92 अशा 132 लाभार्थी शेतक:यांना तर 2016-17 मध्ये तळोदा 64, धडगांव 72 तर अक्कलकुवा तालुक्यातील 299 अशा एकूण 435 लाभार्थीना तेलपंप मंजूर करण्यात आले आहेत़ दोन वर्षातील 567 लाभार्थी शेतक:यांना 100 टक्के अनुदानावर पंप मिळणार होत़े तब्बल तीन वर्षापासून अधिक काळ तळोदा प्रकल्प कार्यालय, विकास महामंडळ आणि संबधित विभागाच्या प्रादेशिक कार्यालयात लाभार्थीची फिरफिर सुरू होती़ यात मार्च 2018 मध्ये प्रकल्प कार्यालयाने जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला निधी वर्ग केला होता़ यानंतर तब्बल सहा महिने उलटूनही शेतक:यांना तेलपंप दिले गेलेले नाहीत़ तेलपंप मिळणार या आशेने सातपुडय़ाच्या दुर्गम-अतिदुर्गम भागातील पात्र लाभार्थी तालुका कृषी कार्यालय आणि प्रकल्प कार्यालयात चकरा मारत आहेत़ परंतू त्यांची समस्या ऐकून घेण्यास दोन्ही विभागांना वेळ नसल्याचे चित्र आह़े
यापूर्वी शेतक:यांना पंप खरेदी करून वाटप करण्याचे धोरण महामंडळाचे होत़े प्रकल्प कार्यालयानेही हे धोरण अंगीकारले असताना आता लाभार्थीनी खरेदी करून देण्याबाबत नापसंती व्यक्त होत आह़े
अक्कलकुवा तालुक्यातील सातपुडय़ाच्या दुर्गम भागातील केवडी येथील 30, बगदा 19, मोरही 8, जमाना 8, पाटबारा 6, भगदरी 5, बेडाकुंड 2, महुपाडा 1, कुकडीपादर 24, चापडी 29, अरेढी 9, पांढरामाती 36, मोवाण 3, गदवाणी 1, उमरागव्हाण 6, खुंटागव्हाण 6, रामपुर 1, उमरकुवा 5, डोडवा 2, छोटे उदेपुर 5, कोलवीमाळ 18, कौलवी 1, ओहवा 13, चिवलउतार 15, वेली 19, उमरागव्हाण 1, राजमोही 1, बेडाकुंड 2, डोडवा 3, मे अंकुशविहीर 1, सोनापाटी 1, पेचरीदेव 1, भरकुंड 15 , कुवा 17, प्रिंपीपाणी 8, चनवाई 2, खाई 31, मोरखी 2, खडकापाणी 2, उर्मिलामाळ 12, कंकाळामाळ 2 खुंटमाळ 2, सल्लीबार 1, वांलबा 11 लाभार्थी तेलपंप मिळण्याच्या आशेने कार्यालयांच्या चकरा मारत आहेत़
अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील शेतक:यांनी शेतजमिनींचे सिंचन व्हावे यासाठी तेलपंपांची मागणी केली होती़ त्यांना तेलपंप मिळत नसल्याने त्यांचे बागायती शेतीचे स्वपA येत्या काळात अपूर्ण राहणार असल्याचे यातून स्पष्ट होत आह़े