नंदुरबार जिल्ह्यातील 444 बालकामगार आले शिक्षणाच्या प्रवाहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:34 PM2018-02-24T12:34:50+5:302018-02-24T12:34:50+5:30
भूषण रामराजे ।
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार, दि़ 24 : राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प संस्थेच्यावतीने नंदुरबार जिल्ह्यात सहा ठिकाणी चालवण्यात येणा:या बालकामगारांच्या शाळांमधून गेल्या चार वर्षात 444 मुले-मुली शिक्षणाच्या मार्गाला लागले आहेत़ प्रकल्प संस्थेने केंद्र शासनाकडून निधी नसतानाही विद्याथ्र्याचे शिक्षण खंडीत न होऊ देता उपक्रम पुढे सुरू ठेवल्याने हे शक्य झाले आह़े
राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प संस्थेकडून दरवर्षी जिल्ह्यात शाळाबाह्य विद्याथ्र्याचे सव्रेक्षण करून त्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जातात़ यासाठी सामाजिक संस्थांकडून शाळा चालवल्या जातात़ या शाळांमध्ये रोजगारानिमित्त स्थलांतरित झालेल्या मजूरांची मुले, ठिकठिकाणी पैसा कमावण्यासाठी कमी वयात जुंपलेल्या बालकामगारांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम केले गेले आह़े विशेष म्हणजे केंद्रशासनाने येत्या दोन वर्षात या शाळां बंद करण्याचा निर्णय घेतला आह़े जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चालवल्या जाणा:या या शाळांसाठी दरवर्षी लागणा:या निधीची पूर्तता होत नसल्याने एकीकडे शाळा डबघाईस आल्या आहेत़ तर दुसरीकडे प्रकल्प संस्थेत प्रकल्प अधिकारी हे पद दोन वर्षापासून रिक्त आह़े अशा स्थितीतही सातत्याने बालकामगारांना प्रोत्साहन देत त्यांना प्रवाहात आणण्याच्या या प्रयत्नामुळे शाळाबाह्य विद्याथ्र्याचा गंभीर प्रश्न मार्गी लागला आह़े जिल्हाधिकारी डॉ़ कलशेट्टी यांच्याकडून शाळांना निधी मिळावा म्हणून केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती आह़े राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प संस्थेकडून भोणे ता़ नंदुरबार, विसरवाडी ता़ नवापूर, वेहगी, बर्डी, जुगलखेत ता़ अक्कलकुवा आणि शेलगदा ता़ धडगाव याठिकाणी बालकामगार किंवा शाळाबाह्य विद्याथ्र्यासाठी शाळा चालवण्यात येत आहेत़ यंदाच्या शैक्षणिक वर्षात या शाळांमध्ये एकूण 180 मुले आणि 74 मुली शिक्षण घेत आहेत़ आई-वडीलांचे स्थलांतर किंवा मजूरी करण्यात पहिली ते चौथीर्पयतच्या प्राथमिक शिक्षणापासून वंचित झालेल्या या बालकामगारांना या शाळेत आणल्यानंतर त्यांच्या प्राथमिक शिक्षणाचे संस्कार केले जातात़ केंद्र शासनाच्या निधीवर चालणा:या प्रत्येक शाळेला वर्षाकाठी 1 लाख 80 हजार रूपयांर्पयत अनुदान दिले जात़े या विद्याथ्र्याचा शैक्षणिक खर्च आणि मासिक भत्ता यासह दोन शिक्षक, एक लिपिक आणि एक शिपाई यांच्या वेतनाचा खर्च संबधित शाळा चालवणा:या संस्थांना भागवावा लागतो़ गेल्या दोन वर्षात केंद्र शासनाने निधीच दिलेला नसल्याने सर्वच कर्मचारी वेतनाअभावी असल्याची माहिती देण्यात आली आह़े
नाईलाजाने रोजगाराची कास धरणा:या मुलामुलींसाठी सवरेत्तम पर्याय असलेल्या बालकामगार प्रकल्प संस्था बंद करण्याबाबत केंद्र सरकारची चर्चा सुरू असल्याने सामाजिक क्षेत्रात चिंता व्यक्त होत आह़े