सरासरीपेक्षा 46 टक्के अधीक पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 12:51 PM2019-08-09T12:51:28+5:302019-08-09T12:52:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात 15 दिवसांपूर्वी 44 टक्के असलेली पावसाची तूट भरून निघत सरासरीपेक्षा अधीक 46 टक्के ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात 15 दिवसांपूर्वी 44 टक्के असलेली पावसाची तूट भरून निघत सरासरीपेक्षा अधीक 46 टक्के पाऊस जास्त झाला आहे. 15 दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरूच असून नदी, नाले भरून वाहत आहेत. लघु व मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा 75 टक्केर्पयत गेला आहे. दरम्यान, गुरुवारी पहाटेपासून दिवसभर मध्यम ते जोरदार पाऊस सुरू होता. त्यामुळे पुन्हा अनेक नदी, नाल्यांना पूर आला. अक्कलकुव्याच्या वरखेडी नदीच्या पुलावरून पाणी गेल्याने सायंकाळी अंकलेश्वर-ब:हाणूर महामार्गाची वाहतूक ठप्प होती.
गेल्या 10 वर्षापासून जिल्ह्यात सरासरी इतका पाऊस होत नव्हता. जास्तीत जास्त 89 टक्केर्पयत चार वर्षापूर्वी पाऊस झाला होता. ती आकडेवारी देखील दोन ठिकाणी झालेल्या ढगफुटीमुळे वाढली होती. अन्यथा इतर तालुक्यात जेमतेमच पाऊस होता. यंदा मात्र 10 ते 12 वर्षाचा रेकॉर्ड तोडत पाऊस जोरदार बरसला आहे. जून ते ऑगस्टच्या सरासरीच्या तुलनेत 46 टक्के अधीक पाऊस झाला आहे. आणखी साधारणत: दीड महिना पावसाचा आहे. या काळात किमान पाऊस झाला तरी यंदा सरासरीपेक्षा अधीक पावसाची नोंद होणार आहे.
दहा वर्षाचा बॅकलॉग भरला
अनेक वर्षापासून सरासरी पेक्षा कमीच पाऊस होत असल्याने आणि तो देखील अनियमित राहत असल्यामुळे अनेक भागात दुष्काळी परिस्थिती राहत होती. नंदुरबार तालुक्याचा पूर्व भाग व त्याला लागून असलेला शहादा तालुक्यातील तापी पट्टयाचा भाग हा अवर्षण प्रवण म्हणून ओळखला जावू लागला होता. जमिनीतील पाण्याची पातळी देखील नियमितपेक्षा दीड ते अडीच मिटरने खोल गेली होती. विहिरी, कुपनलिका फेब्रुवारी, मार्चमध्येच कोरडय़ा होत होत्या. यंदा मात्र पावसाळ्याच्या अवघ्या दोनच महिन्यात पावसाने सरासरीपेक्षा अधीक हजेरी लावली. सध्याच्या परिस्थितीत जिल्ह्याच्या सरासरीच्या तुलनेत 70 टक्के पाऊस झाला आहे. तर दोन महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत पाऊस 46 टक्के अधीक झाला आहे. यंदाची विशेषत: म्हणजे सर्वच भागात सारखाच पाऊस होत आहे. त्यामुळे अनेक वर्षाचा बॅकलॉग भरून निघाला आहे.
15 दिवसात बदलले चित्र
यंदा केवळ 15 दिवसांच्या पावसाने चित्र बदलले आहे. 23 जुलै र्पयत जिल्ह्यात सरासरी केवळ 30 टक्के पाऊस होता. त्यामुळे पावसाची तूट तब्बल जून, जुलै महिन्याच्या तुलनेत 44 टक्केर्पयत होती. परंतु 24 जुलैपासून सुरू झालेल्या पावसाने सर्वच आकडे बदलून टाकले.
आतार्पयत दोन महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत 46 टक्के पेक्षा अधीक आकडा गेला आहे. ऑगस्टच्या पहिल्याच आठवडय़ात पावसाने 70 टक्केर्पयत बरसण्याची ही पहिलीच वेळ मानली जात आहे.
प्रकल्प भरले, विहिरी तुडूंब
पावसामुळे यंदा जिल्ह्यातील लघु प्रकल्पांमधील पाणीसाठा 75 टक्केर्पयत तर मध्यम प्रकल्पांमधील 80 टक्के असा 37 लघु व चार मध्यम प्रकल्पांमधील एकुण सरासरी पाणीसाठा 75 टक्केर्पयत पोहचला आहे. गेल्यावर्षी पुर्ण पावसाळ्यात केवळ 60 टक्के पाणीसाठा झाला होता.
सर्वाधिक नवापूर
आतार्पयत सर्वधिक पाऊस नवापूर तालुक्यात सरासरीचा 83 टक्के झाला आहे. तर सर्वात कमी अक्कलकुवा तालुक्यात 60 टक्के झाला आहे. तर नंदुरबार, तळोदा व धडगाव तालुक्याने सरासरीची सत्तरी पार केली आहे.
हतनूर धरण पातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन 8 ऑगस्ट रोजी धरणाचे सर्व 41 गेट पुर्ण उघडल्याने तापीची पाणी पातळी आणखी वाढली आहे. त्यामुळे तापी नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
4शिवण नदीवरील विरचक प्रकल्पात देखील पाण्याची आवक सुरूच आहे. प्रकल्पात 81 टक्केपेक्षा अधीक पाणीसाठा झाल्याने टप्प्याटप्प्याने 150 ते 200 क्यूमेक्स पाणी सोडले जात आहे. त्यामुळे शिवण नदी काठावरील गावांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
4रंगावली प्रकल्पातून देखील पाण्याचा विसर्ग सुरू आहे. प्रकल्प पुर्ण भरला असून 756 क्यूसेस पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. त्यामुळे रंगावली नदी दुथडी भरून वाहत आहे.
तळोदा, अक्कलकुवा, धडगाव, तालुक्यासह सातपुडय़ाच्या पर्वतराजीत जोरदार पाऊस झाल्याने वरखेडी नदीला पूर आला. परिणामी अक्कलकुव्यातील पुलाच्या वरून पाणी वाहू लागल्याने गुजरात आणि महाराष्ट्र राज्याला जोडणारा नेत्रांग-शेवाळी महामार्गवरील तळोदा ते अक्कलकुवा दरम्यानचे चार पूल पाण्याखाली गेले. महामार्गावरील वाहतुक ठप्प झाली. त्यामुळे वाहनांच्या रांगाच रांगा दोघं बाजूला लागल्या होत्या. तळोदा-अक्कलकुवा मार्गावर वण्याविहीर ते मोदलपाडा गावा दरम्यान असणा:या पुलाचा वरून पाणी वाहत होते, तसेच लोभणी फारशी पुलावरून पाणी वाहत होते. कोणत्याही प्रकारची आपत्ती होऊ नये या दृष्टिकोनातून अक्कलकुवा तहसीलदार नितीन देवरे तसेच पोलिस प्रशासनाने नागरिकांची वाहनधारकांची सुरक्षा म्हणून पुलाच्या दोघ बाजूला पोलिस बंदोबस्त लावला होता.दरम्यान पाऊसाचा वाढता जोर कायम असल्याने पातळी वाढतच आहे.