नंदुरबार जिल्ह्यातील 47 हजार शेतक:यांना ग्रीन लिस्टची प्रतिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 11:58 AM2017-11-07T11:58:04+5:302017-11-07T11:58:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील पात्र शेतक:यांना अद्यापही कजर्मुक्तीच्या यादीची प्रतिक्षा लागून आहे. अद्याप शासनाकडून एकाही पात्र शेतक:याला या योजनेचा लाभ मिळालेला नसल्याची स्थिती आहे. राष्ट्रीयकृत बँकांना पहिली ग्रीन लिस्ट प्राप्त झाली असली तरी त्यातील नावांची व त्यांच्या कर्जाची शहनिशा करण्याचे काम सुरू आहे.
राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र शेतक:यांना कजर्मुक्ती जाहीर केली आहे. त्यासाठी विविध स्तरावरून प्रक्रिया राबविण्यात आली. दिवाळीच्या दोन दिवस 17 शेतक:यांचा प्रातिनिधीक स्वरूपात कजर्मुक्तीचे प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला होता. त्यामुळे पात्र शेतक:याना आज ना उद्या कजर्मुक्ती होईल ही आस लागून आहे.
गेल्या दोन महिन्यात राबविण्यात आलेल्या ऑनलाईन प्रक्रियेत एकुण जिल्ह्यातील 47 हजार 790 शेतक:यांनी मुदतीत कजर्माफीचे ऑनलाईन अर्ज भरले आहेत. त्यापैकी दिवाळीला 20 शेतक:यांना प्रत्यक्ष कजर्माफीचे प्रमाणपत्र देण्यात आले. त्यात 17 शेतक:यांना जिल्हास्तरावर तर तीन शेतक:यांना राज्यस्तरावर प्रमाणपत्र देण्यात आले होते. कजर्मुक्तीचे ऑनलाईन अर्ज भरतांना शेतक:यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. त्या दिव्यातून शेतकरी बाहेर पडल्यानंतर दिवाळीला तरी किमान कजर्माफीची गोड बातमी मिळेल अशी अपेक्षा असतांना ती देखील फोल ठरली आहे. आता केवळ प्रतिक्षा करण्यातच दिवस जात आहेत.
जिल्हा बँकेअंतर्गत कजर्दार शेतक:यांची पहिली ग्रीन लिस्ट आधी जाहीर होणार अशी अपेक्षा असतांना अद्याप त्या जाहीर झालेल्या नाहीत. राष्ट्रीयकृत बँकांना काही शेतक:यांच्या नावांची यादी आलेली असली तरी आधी बँक स्तरावर शहनिशा करून त्यानंतरच प्रत्यक्ष लाभ देण्याबाबत निर्णय घेण्याच्या सुचना आधीच सहकार विभागाने दिलेल्या आहेत. त्यामुळे संबधित बँका व एकुण लिड बँक देखील सर्व प्रक्रिया काळजी पूर्वक हाताळत आहे. परिणामी अद्याप एकाही शेतक:याला प्रत्यक्ष लाभ मिळालेला नसल्याचे दिसून येते.
20 हजार शेतक:यांची पहिली ग्रीन लिस्ट जिल्हा बँकेच्या माध्यमातून जाहीर होण्याची अपेक्षा होती. परंतु त्याबाबतही काही हालचाली नसल्याचे दिसून येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिवाळीला पालकमंत्र्यांच्या हस्ते ज्या 17 शेतक:यांना प्रमाणपत्र देण्यात आले होते त्यापैकी अनेकांची नावे यादीत आलेली नाही. त्यामुळे त्या शेतक:यांमध्ये देखील चलबिचल निर्माण झाली आहे.
उत्सूकता लोप पावली
कजर्मुक्तीची पूर्वी जी उत्सूकता होती ती आता राहिलेली नाही. शासनाने यासंदर्भातील प्रक्रिया राबवितांना शेतक:यांना एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर मेटाकुटीस आणले आहे की आता नको ती कजर्मुक्ती असे म्हणण्याची वेळ शेतक:यांवर आली आहे. त्यामुळे देणार असाल तर द्या अन्यथा राहू द्या.. या स्थितीत शेतकरी आलेले आहेत.
नियमित कजर्फेड करणा:यांना देखील 25 हजारांर्पयत लाभ मिळणार आहे. त्यामुळे नियमित कजर्फेड करणा:यांना शेतक:यांनाही त्याची उत्सूकता असतांना त्यांच्या खात्यावरही रक्कमा जमा होतांना दिसून येत नसल्याची स्थिती आहे.
एकुणच कजर्मुक्ती योजनेबाबत शेतक:यांमध्ये पूर्वी जी चढाओढ आणि उत्सूकता होती ती आता राहिलेली नाही.