49 इंग्रजी शाळांना फी परताव्याची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 11:55 AM2017-09-09T11:55:16+5:302017-09-09T11:55:16+5:30
आरटीई अंतर्गत प्रवेश : धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील संस्थाचालक त्रस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : आरटीईअंतर्गत विद्याथ्र्याना मोफत प्रवेश देणा:या धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील 49 इंग्रजी माध्यमाच्या शाळांना तीन वर्षात शासनाकडून फी परतावा मिळाला नसल्याने समस्या निर्माण झाली आह़े संस्थाचालकांनी नंदुरबार प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आह़े
धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमाच्या 49 शाळांनी आरटीईअंतर्गत विद्याथ्र्याना प्रवेश दिल्यानंतर या विद्याथ्र्याना माफ झालेली शासनाचा शिक्षण विभाग देणार होता़ मात्र तीन वर्षात शाळांना फीचा परतावा मिळालेला नाही़ शासनाकडे संस्थाचालकांचे तब्बल 1 कोटी 84 लाख रूपये थकीत आहेत़ यामुळे संस्थाचालकांना शाळेच्या इतर भौतिक सुविधा पुरवण्यास समस्या निर्माण होत आहेत़
प्राथमिक शिक्षणाधिकारी अरूण पाटील यांच्यासोबत इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे संस्थाचालकांनी चर्चा करून कारवाईची मागणी केली़ यावेळी उपशिक्षणाधिकारी डॉ़राहुल चौधरी, मेस्टा संघटनेचे विभागीय अध्यक्ष योगेश पाटील, धुळे-नंदुरबार जिल्हाध्यक्ष प्रमोद पटेल, सचिव पुष्पेंद्र रघुवंशी, रमेश जैन, प्रदीप गिरासे यांच्यासह 48 संचालक उपस्थित होत़े