धडगाव येथील विज्ञान प्रदर्शनात 50 उपकरणांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 05:29 PM2019-01-05T17:29:59+5:302019-01-05T17:30:05+5:30
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन : विद्याथ्र्यानी वैज्ञानिक दृष्टीकोण जोपासण्याचा सल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
धडगाव : तालुक्यातील कुंडल येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत दोन दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन पंचायत समितीचे सभापती कालुसिंग पावरा यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात तालुक्यातील शाळांनी एकूण 50 उपकरने मांडली होती.
धडगाव तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, पंचायत समिती शिक्षण विभाग व तालुका विज्ञान मंच यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. प्रथम भारतर} डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलम यांच्या प्रतीमेचे पूजन करून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प. सदस्य हारसिंग पावरा, सरपंच पाचा पाडवी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश पाडवी, पं.स. सदस्य गौतम वसावे, गटशिक्षणाधिकारी जे.ए.चौरे, शिक्षण विस्तार अधिकारी राजपूत, तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष के.जी पाठक, सचिव प्रवीण बोरसे, भरत पावरा, यु.के.पाडवी, दमयंती तडवी नगीन पाटील उपस्थित होते.
बक्षीस वितरण समारोपाला अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे हे होते. आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात ते म्हणाले की, विज्ञान विचार प्रत्येक विद्याथ्र्याच्या मनात रुजण्यासाठी शालेय विज्ञान प्रदर्शन महत्वाची भूमिका बजावत असते.
मुलांच्या कल्पनाशक्तीचा विकास घडविण्याचा विकास हा शाळेत होत असतो. विद्याथ्र्याना नासा सारख्या संस्थेत बाल वैज्ञानिक म्हणून काम करण्याची संधी मिळत़े याकडे लक्ष घातले पाहिजे, प्रत्येकात वैज्ञानिक दृष्टीकोन आहे, अडचण आहे ती फक्त भाषेची. भाषिक अडचण ही अभेद्य भिंत नाही तिची सोडवणूक करता येवू शकते. असे मार्गदर्शन करण्यात आल़े
दुर्गम भागातील विद्याथ्र्यानी विज्ञान प्रदर्शनात हिरारीने सहभाग घेण्याचे आवाहन शिक्षण विस्तार अधिकारी शीलवंत वाकोडे यांनी केले. विद्याथ्र्यानी वैज्ञानिक दृष्टीकोणाने प्रत्येक घटनेकडे बघितल्यास आपण अंधश्रध्येचे बळी ठरणार नाही असे मत परीक्षक नगिन पाटील यांनी मांडले.
या प्रदर्शनात प्राथमिक व माध्यमिक असे दोन गट विद्याथ्र्यासाठी करण्यात आले होत़े तर शिक्षकांसाठी शैक्षणिक साहित्याचा वेगळा गट करण्यात आला. प्रदर्शनात प्रामुख्याने कृषी, पर्यावरण, अपारंपारिक उर्जा, स्वच्छता व आरोग्य, आपत्कालीन व्यवस्था, अन्न सुरक्षा, वैज्ञानिक कुतूहल यासह महत्वाच्या शाळा उपयोगी उपकरणांचा प्रामुख्याने समावेश होता. अतिदुर्गम भागातील शाळेतील विद्याथ्र्यानी तयार केलेल्या या उपकरणांनी उपस्थितांना भारावून टाकल़े बालवैज्ञानिकांचे मान्यवरांनी कौतुक केले.
उपकरणांचे परीक्षण एन.व्ही.पाटील, एस.बी. पाटील, आर.डी.माळी, पी.एच. सोनवणे, एम.पी. पाटील यांनी केले. सुत्रसंचालन भरत शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन सचिन जळोदकर यांनी मानल़े