50 पैशांवरच आणेवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 01:26 PM2017-09-17T13:26:23+5:302017-09-17T13:26:23+5:30

नजरआणेवारी जाहीर : 856 खरीप गावांचा समावेश

  On 50 paise I will take turns | 50 पैशांवरच आणेवारी

50 पैशांवरच आणेवारी

Next
ठळक मुद्देलागवडीच्या आधारावर काढला अंदाज जिल्ह्यातील दोन लाख 59 हजार हेक्टर क्षेत्रात लागवड झालेल्या खरीप पिकांच्या लागवडक्षेत्राच्या आधारे ही आकडेवारी जाहिर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े पावसाअभावी पिकांचे झालेले नुकसान आणि पेरणी करूनही उत्पादन न आलेल्य

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील 886 महसूली गावांची पैसेवारी जाहिर केली आह़े या सर्व गावांमधील नजरअंदाज प्रशासनाने पैसेवारी जाहिर केली असून ती 50 पैश्यांपेक्षा अधिक आह़े 
जाहिर करण्यात आलेल्या आणेवारीनुसार नंदुरबार तालुक्यातील 145, नवापूर 165, तळोदा , 93, शहादा 160, अक्कलकुवा 194 आणि धडगाव तालुक्यातील 99 गावांमध्ये तलाठींनी नजर आणेवारी करत तसा अहवाल प्रशासनाकडे पाठवला होता़ विविध पिकांची स्थिती आणि पाऊस यांची पडताळणी करून ही पैसेवारी काढण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े शेतक:यांनी यंदा कापूस, ज्वारी, बाजरी यासह तेलबिया आणि कडधान्य पिकांची स्थिती समाधानकारक असल्याने प्रत्येक गावात 50 पैश्यांपेक्षा अधिक आणेवारी काढण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े
नंदुरबार आणि शहादा तालुक्यात यंदा पावसाने कमीअधिक प्रमाणात हजेरी लावल्याने पिकांचे नुकसान झाले होत़े त्यामुळे या भागात दुष्काळी स्थिती असल्याचे शेतक:यांचे म्हणणे होत़े या स्थितीची योग्य पाहणी न करताच नजर पैसेवारी जाहिर करण्यात आल्याने शेतक:यांनी नाराजी व्यक्त केली आह़े येत्या ऑक्टोबर महिन्यात सर्व गावांची अंतिम पैसेवारी जाहिर करण्यात येणार असल्याची माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली आह़े
 

Web Title:   On 50 paise I will take turns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.