ब्राह्मणपुरी येथे ५२ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यूने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:22 AM2021-01-13T05:22:07+5:302021-01-13T05:22:07+5:30
मिळालेल्या माहितीनुसार, ब्राह्मणपुरी येथील एका ५२ वर्षीय पुरुषाला १ जानेवारी रोजी कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांना ...
मिळालेल्या माहितीनुसार, ब्राह्मणपुरी येथील एका ५२ वर्षीय पुरुषाला १ जानेवारी रोजी कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांना नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. येथून त्यांना ५ जानेवारी रोजी सुरत येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आठवडाभरापासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पण अखेर सोमवारी त्याचे निधन झाले. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबासह ब्राह्मणपुरी येथे शोककळा पसरली आहे.
कोरोनाचा धोका कमी झाला आणि रुग्णसंख्याही कमी झाली असे समजून अनेक जण नियमांचे उल्लंघन करताना दिसतात. पण या घटनेमुळे या जीवघेण्या संसर्गाचा धोका अद्याप कायम असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याचे समोर आले होते. पण आठवडाभरात पुन्हा पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाचीही धाकधूक वाढली आहे. एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे कोरोनाचा नवा जीवघेणा प्रकार समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे प्रमाण वाढले आहे.