शेल्टी येथील शिबिरात ५५ जणांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:21 AM2021-07-16T04:21:56+5:302021-07-16T04:21:56+5:30
सामाजिक कर्तव्य म्हणून लोकमतने ‘लोकमत रक्ताचं नातं’ या अभियानांतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील विविध गावांमध्ये २ जुलै ते २१ जुलै दरम्यान ...
सामाजिक कर्तव्य म्हणून लोकमतने ‘लोकमत रक्ताचं नातं’ या अभियानांतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील विविध गावांमध्ये २ जुलै ते २१ जुलै दरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. त्याअनुषंगाने शेल्टी, ता.शहादा येथे गुरुवारी ५५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्व.जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त लोकमत व विविध शहर ग्राम गुजर पाटीदार ग्लोबल मित्र मंडळ व्हीएसजीजीएम यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सहा महिलांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदानात आपला सहभाग नोंदविला.
मातोश्री ऑटोमोबाइल संचालक, ग्रामपंचायत सदस्य नितीन नत्थू पाटील आणि कविता नितीन पाटील या दाम्पत्याने रक्तदान करून आपला सहभाग नोंदविला.
‘लोकमत रक्ताचं नातं’ या लोगोचे कल्याणी पाटील आणि अंकिता पाटील यांनी रांगोळीतून सुबक कलाकृती साकारली.
रक्तदान शिबिरासाठी शेल्टी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, ग्रामस्थ, नवयुवक मित्रमंडळ सदस्य यांचे योगदान लाभले. रक्तसंकलन धुळे येथील नवजीवन रक्त संकलन पेढीचे संचालक डॉ.सुनील चौधरी, दिलीप पाटील, रोहिदास जाधव, गजानन चौधरी, उद्धव पाटील, कैलास पाटील, चंद्रकांत दंडगव्हाळ, पांडुरंग गवळी यांनी रक्तसंकलन केले.