मोड गावठाणात 56 कुटूंबांचे पुनवर्सन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 12:25 PM2018-01-20T12:25:32+5:302018-01-20T12:25:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरद : तळोदा तालुक्यातील मोड गावठाणात धडगाव तालुक्यातील सरदार सरोवर प्रकल्पबाधित 56 कुटूंबांचे पुनवर्सन करण्यात येणार आह़े यासाठी देण्यात आलेल्या पाच हेक्टर जमिन सरदार सरोवर प्रकल्प विभागाकडे वर्ग करण्यात आली आह़े
मोड गावालगत असलेल्या या जमिनीचे भूमिपूजन गुरूवारी करण्यात आल़े प्रसंगी पंचायत समितीच्या सभापती शांतीबाई दिवाकर पवार, उपसभापती दीपक गोरख मोरे, सरदार सरोवर प्रकल्प विभागाचे उपजिल्हाधिकारी सुनिल सूूर्यवंशी, तहसीलदार योगेश चंद्रे, सहायक अभियंता व्ही़एच़खंदारे, मंडळ अधिकारी आऱएऩकोळी, ग्रामविकास अधिकारी शांतीलाल बावा, नर्मदा बचाव आंदोलनाचे नूरजी वसावे, लतिका राजपूत, विजय वळवी, ओरसिंग पटले, तलाठी अरूण धनगर, सुभाष ठाकरे उपस्थित होत़े प्रसंगी तहसीलदार योगेश चंद्रे यांनी पुनवर्सन प्रक्रियेची माहिती दिली़ प्रसंगी नर्मदा बचाव आंदोलनाचे नूरजी वसावे यांनी पाच हेक्टरपेक्षा अधिक जागा शासनाने द्यावी, यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितल़े सरपंच जयसिंग माळी यांनी जिल्हाधिकारी डॉ़ कलशेट्टी यांच्या सूचनेनुसार मोड गावामधून जमिन दिल्याची माहिती दिली़ मोड गावालगत असलेल्या या जमिनीवर 39 आदिवासी शेतकरी कुटूंबांकडून पीकपेरा होत होता़ त्यामुळे ही जमिन द्यावी की, न द्यावी याबाबत घालमेल सुरू होती़ परंतू प्रशासनाच्या आग्रहाने आदिवासी बांधवांसाठीच जमिन दिल्याचे माळी यांनी शेवटी सांगितल़े
घराची जागा उपलब्ध 56 कुटूंबांचे प्रतिनिधिही या कार्यक्रमास उपस्थित होत़े अनेक वर्षापासून विस्थापन होऊनही निवासाची जागा मिळत नसल्याने त्यांचा संघर्ष सुरू होता़ घराची जागा मिळाल्याने त्यांची समस्या सुटली आह़े