अक्कलकुव्यात 57 तर नंदुरबारात 69 टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 12:01 PM2019-06-24T12:01:09+5:302019-06-24T12:01:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील 63 ग्रामपंचायतींच्या 91 सदस्य आणि 2 लोकनियु्क्त सरपंच पदासाठी पोटनिवडणूक ...

57 per cent voters in Akkalkukta and 69 per cent in Nandurbar | अक्कलकुव्यात 57 तर नंदुरबारात 69 टक्के मतदान

अक्कलकुव्यात 57 तर नंदुरबारात 69 टक्के मतदान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील 63 ग्रामपंचायतींच्या 91 सदस्य आणि 2 लोकनियु्क्त सरपंच पदासाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहिर केला होता़ यांतर्गत रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली़ सर्वाधिक चुरशीच्या अक्कलकुवा ग्रामपंचायत  लोकनियुक्त सरपंच पदासाठी 57़88 टक्के तर नंदुरबार तालुक्यातील चार ग्रामपंचायतींसाठी 69 टक्के मतदान झाल़े    
अक्कलकुवा ग्रामपंचायतीच्या अनुसूचित जमाती महिला राखीव लोकनियुक्त सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी गेल्या 10 दिवसांपासून प्रचार सुरु होता़ रविवारी सकाळपासून शहरातील 14 प्रभागात 14 मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली़ काहीशी संथ सुरुवात झाल्यानंतर दुपारी मतदारांनी मतदानासाठी हजेरी लावल्याने 66 टक्के मतदान झाल़े याठिकाणी भाजप पुरस्कृत माजी सरपंच उषाबाई बोहरा, काँग्रेस पुरस्कृत सुशिलाबाई गेमू वळवी आणि एमआएम पुरस्कृत उमेदवार राजेश्वरी इंद्रवदन वळवी अशी तिरंगी लढत रंगली होती़ 10 दिवसांपासून उमेदवारांचा प्रचार रंगला होता़ अक्कलकुवा शहरात जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक, दोन आणि तीन या ठिकाणी 10, मक्राणीफळी भागात 3 तर मिठय़ाफळी भागात 1 अशा 14 बूथवर मतदान प्रक्रिया पार पडली़ 14 मतदान केंद्रांवर 70 अधिकारी व कर्मचा:यांची नियुक्ती करण्यात आली होती़  केंद्रावर 1 केंद्राध्यक्ष 3 मतदान अधिकारी, एक शिपाई, अशा पथकांची नियुक्ती होती़ पोलीस दलातर्फे पोलीस उपनिरीक्षक, 10  ब्लॅक कमांडो,8 पुरुष आणि 2 महिला पोलीस कर्मचा:यांचे फिरते पथक तयार करण्यात आले होत़े सायंकाळर्पयत शहरात मतदानाला कोणत्याही प्रकारची अप्रिय घटना घडलेली नाही़
सोमवारी सकाळी 10 वाजेनंतर अक्कलकुवा आणि नंदुरबार येथे मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आह़े यासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आह़े 

4अक्कलकुवा येथे प्रभाग क्रमांक एक-369, प्रभाग दोन-362, प्रभाग चार-329, प्रभाग चार-459, प्रभाग पाच-417, प्रभाग सहा-288, प्रभाग सात-481, प्रभाग आठ-437, प्रभाग नऊ-443, प्रभाग दहा -496, प्रभाग 11-521, प्रभाग 12- 445, प्रभाग 13-307 तर प्रभाग 14 मध्ये 521 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला़ एकूण 10 हजार 151 पैकी 5 हजार 876 जणांनी मतदान केल़े यात 3 हजार 262 पुरुष तर 2 हजार 613 स्त्री मतदारांचा समावेश आह़े
4नंदुरबार तालुक्यातील वेळावद ग्रामपंचातीच्या एका जागेसाठी 81़05 टक्के मतदान झाल़े 153 स्त्री आणि 138 पुरुष अशा 291 जणांनी मतदान केल़े उमर्दे खुर्द येथील एकाच प्रभागातील दोन जागांसाठी 62़62 टक्के मतदान झाल़े 205 स्त्री आणि 206 पुरुष अशा 411, नळवे खुर्द येथे एका जागेसाठी 57़74 टक्के मतदान झाल़े 125 स्त्री व 127 पुरुष अशा 252 तर पावला येथे एका जागेसाठी 83 टक्के मतदान झाल़े 195 स्त्री आणि 181 पुरुष अशा 376 मतदारांनी मतदान केल़े 
 

Web Title: 57 per cent voters in Akkalkukta and 69 per cent in Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.