सातारा जिल्ह्यात अडकलेले ५७ मजूर तळोदा तालुक्यातील मालदा येथे परतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 12:48 PM2020-04-23T12:48:59+5:302020-04-23T12:49:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातून ऊसतोडणीसाठी पश्चिम महाराष्ट्रात गेलेल्या मजूरांना परत आणण्यासाठी लोकसंघर्ष मोर्चाकडून राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरु ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातून ऊसतोडणीसाठी पश्चिम महाराष्ट्रात गेलेल्या मजूरांना परत आणण्यासाठी लोकसंघर्ष मोर्चाकडून राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरु होता़ यांतर्गत सातारा जिल्ह्यात अडकलेले ५७ मजूर मालदा ता़तळोदा येथे परत आणले गेले आहेत़
सातारा जिल्ह्यातील फलटन तालुक्यातील मधील जवाहर श्रीराम साखर कारखान्यात तळोदा तालुक्यातील धजापाणी आणि मालदा येथील मजूर अडकून पडले होते़ त्यांनी लोकसंघर्ष मोर्च्याच्या प्रतिभा शिंदे यांना संपर्क केला होता़ या मजूरांना परत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व कारखानदारांना आपल्या कारखान्यातील सर्व मजुरांची पूर्ण तपासणी करून व कारखान्याचा वाहनाने मजुरांना त्यांच्या गावापर्यंत पोहचवण्याचे आदेश दिले होते़ त्यानुसार ५७ मजूर कुटूंबासह धजापाणी आणि मालदा येथे सुखरुप दाखल झाले आहेत़ त्यांना परत आणण्यासाठी लोकसंघर्षच्या प्रतिभा शिंदे,सचिन धांडे, कथा वसावे, रमेश नाईक, प्रकाश बारेला, सोमनाथ माळी, पन्नालाल मावळे, संजय शिरसाठ, संजय महाजन, निशांत मगरे, गणेश पराडके, रमेश वारेला ,इरफान तडवी यांनी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करुन मजूरांना परत आणण्याची मागणी केली होती़