नंदुरबारात विमा योजनेंतर्गत 4 वर्षात 6 हजार लाभार्थीना आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 12:58 PM2018-05-13T12:58:23+5:302018-05-13T12:58:23+5:30
आम आदमी विमा योजना : मयतांच्या वारस विद्याथ्र्याना शिष्यवृत्ती
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 13 : 2014 पासून शासनाने सुरू केलेल्या आम आदमी विमा योजनेत नंदुरबार जिल्ह्यातील 6 हजार लाभार्थीना विम्याचा लाभ मिळाला आह़े यात नैसर्गिक व अपघाती मृत्यू झालेल्या मयताच्या प्रत्येकी 2 वारसांना शिष्यृत्तीही मिळाली असून अपघातात अपंगत्व आलेल्यांनाही विम्याची रक्कम देण्यात आली आह़े
राज्यातील भूमिहीन कुटुंबातील शेतमजुरांसाठी ही विमा योजना शासनाने आणली होती़ याअंतर्गत 18 ते 59 वयोगटातील ग्रामीण भागातील भूमिहीन कुटूंबातील शेतमजूर व 5 एकरपेक्षा कमी कोरडवाहू व 2़5 एकरपेक्षा कमी बागायती शेतजमीन असलेल्या शेतक:यांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास 30 हजार, अपघाती मृत्यू झाल्यास 75 हजार किंवा अपघातात अपंगत्व आल्यास 37 हजार 500 रूपये देण्याचे ठरवण्यात आले होत़े गेल्या तीन वर्षात या योजनेत सर्व संवर्गातील लाभार्थीचा समावेश करून घेत त्यांना लाभ देण्यात आल्याने अनेकांच्या निराधार झालेल्या कुटुंबांना विम्याचा काहीअंशी आधार मिळाला आह़े योजनेत 2017-18 अखेर तब्बल 98 लाभार्थीना लाभ देण्यात आला आह़े गावागावातील तलाठी यांच्यामार्फत तहसीलदार व तहसील कार्यालयमार्फत संजय गांधी निराधार योजना समिती समोर दर तीन महिन्यांनी होणा:या सुनावणीत या प्रस्तावांवर कारवाई करण्यात आली होती़ योजनेंतर्गत फेब्रुवारी 2017 मध्ये योजना सुटसुटीतपणे चालवता यावी यासाठी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाकडे विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना वर्ग करण्यात आली आह़े यातून काहीअंशी कामकाजाचा ताळमेळ बसत नसल्याने यंदाच्या वर्षातील प्रस्तावांवर सुनावणी होऊन कार्यवाही होण्यास अडचणी येत असल्याचे लाभार्थीचे म्हणणे आह़े आजअखेरीस नंदुरबार 10 हजार 635, तळोदा 4 हजार, अक्कलकुवा, 17 हजार 650, धडगाव 5 हजार 702, नवापूर 8 हजार 546 तर शहादा तालुक्यातील 21 हजार 650 नागरिकांच्या नोंदण्या करण्यात आल्या आहेत़ एकूण 68 हजार 183 लाभार्थीच्या विम्यापोटी विमा कंपनीकडे तब्बल 33 लाख 45 हजार रुपयांचा भरणा शासनाकडून करण्यात आला असल्याची माहिती आह़े या लाभार्थीपैकी 98 लाभार्थीचे विविध दावे गेल्या वर्षात मंजूर करण्यात आले होत़े या लाभार्थीना त्या घटकांनुसार विम्याची रक्कम वितरित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े
एकीकडे विमा योजनेत लाभार्थीच्या नोंदण्या वाढत असताना दुसरीकडे विद्याथ्र्याच्या नोंदण्याबाबत नागरिकांमध्ये उदासिनता आह़े विमाधारक शेतमजूर आणि शेतक:यांच्या कुटुंबांतील केवळ 2 हजार 381 विद्याथ्र्याची नोंदणी झाली आह़े यात नंदुरबार 1 हजार 898, तळोदा 30, अक्कलकुवा 24, धडगाव 294, नवापूर 135 तर शहादा तालुक्यात शून्य विद्याथ्र्याच्या नोंदणी करण्यात आल्या होत्या़ यातील काहींनी शिष्यवृत्तीचे 16 हजार 500 रुपये गेल्यावर्षी वर्ग करण्यात आले होत़े