नंदुरबारात वर्षाला 60 बालक कुपोषणमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 11:39 AM2017-11-08T11:39:29+5:302017-11-08T11:39:29+5:30

आरोग्य संवर्धन : जिल्हा रूग्णातील पोषण पुनवर्सन केंद्रात प्रयत्न

60 child malnutrition free of cost in Nandurbar | नंदुरबारात वर्षाला 60 बालक कुपोषणमुक्त

नंदुरबारात वर्षाला 60 बालक कुपोषणमुक्त

Next
ठळक मुद्दे15 दिवसांच्या आहार नियोजनातून प्रयत्न
कमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कुपोषणामुळे युनिसेफने दखल घेतलेल्या नंदुरबार जिल्हा हा कुपोषणमुक्तीच्या मार्गावर आह़े यात जिल्ह्यातील आरोग्य सेवा सहाय्यकारी ठरत असून जिल्हा रूग्णालयातील पोषण पुनवर्सन केंद्रातून वर्षाला 60 बालक कुपोषण मुक्त होत आहेत़ कुपोषणाची गंभीर सोडवता यावी म्हणून कोटय़ावधी रुपयांचा निधी आजवर उपलब्ध करून देण्यात आला आह़े यानिधींतर्गत 2011 पासून नंदुरबार जिल्हा सामान्य रूग्णालयात पोषण पुनवर्सन केंद्राची निर्मिती करण्यात आली आह़े कुपोषित बालकाला योग्य तो आहार देऊन मातेसह कुटूंबियांचे समुपदेश करण्याच्या या केंद्रात प्रत्येक महिन्याला 40 बालकांवर उपचार होतो़ यात कुपोषित बालकांवर विशेष लक्ष देऊन त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत़ यासाठी याठिकाणी वैद्यकीय अधिका:यासह पाच कर्मचारी नियुक्त आहेत़

Web Title: 60 child malnutrition free of cost in Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.