गावठी दारुसह 60 हजारांचा मुद्देमाल जप्त : सोरापाडा/नवापाडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 11:48 AM2018-02-04T11:48:29+5:302018-02-04T11:48:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सोरापाडा व नवापाडा ता़ अक्कलकुवा येथून गावठी दारुसह एकूण 60 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आह़े ही गावठी दारु नष्ट करण्यात आली आह़े
शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही कारवाई नंदुरबार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने करण्यात आली आह़े सोरापाडा येथील एका बिअर शॉपीमधून 30 हजार 572 किंमतीचा अवैधमद्यसाठा पकडण्यात आला आह़े त्याच प्रमाणे नवापाडा येथील जिरा नदीच्या काठावर असलेल्या 38 हजार 125 रुपये किंमतीची गावठी दारु नष्ट करण्यात आली आह़े दरम्यान, याप्रकरणी आरोपींना पकडण्यात मात्र पोलिसांना यश आलेले नाही़ या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात बनावट व गावठी दारुचासाठा असल्याची माहिती मिळताच विभागाच्या कर्मचा:यांनी आपली मोहिम सोरापाडा व नवापाडा येथे वळवली़
या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात हातभट्टीव्दारे गावठी दारु बनविण्यात येत होती़ दरम्यान, पथकातील पोलीस कर्मचा:यांना पाहून आरोपींनी पोबारा केला़ या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात दारु बनविण्याचे साहित्य, दारु तसेच इतर दस्ताऐवज नष्ट करण्यात आल़े
इतरही अड्डे नष्ट करण्याची गरज.
या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात बनावट मद्यसाठा बनवण्याचे अड्डे आहेत़ त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने याकडे आपला मोर्चा वळवला होता़
नंदुरबार राज्य उत्पादन शुल्काचे अधिक्षक नितीन घुले व पोलीस अधिक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली़ मोहिमेत पोलीस निरीक्षक पी़एम़ गौडा, दुय्यम निरीक्षक मनोज संबोधी, बी़डी़ बागले, हेमंत पाटील, मोहन पवार, अविनाश पाटील, शशिकांत नाईक, नितीन गांगुर्डे, जगदीश पवार, राहुल भामरे आदींचा समावेश होता़