नवापूर तालुक्यातील बोरविहिर येथे सागवान लाकडासह 60 हजारांचा ऐवज जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 12:02 PM2019-03-06T12:02:55+5:302019-03-06T12:03:01+5:30
बोरविहिर : वन विभागाची कारवाई
नवापूर : तालुक्यातील बोरविहीर शिवारात वन विभागाने टाकलेल्या धाडीत सागाचा लाकडासह फर्निचर, मशिनरी व इतर साहित्य असा एकुण 60 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.
नवापूर वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे यांना गुप्त माहिती मिळाल्याने त्यांनी वनकर्मचारी यांच्या पथकासह बोरविहीर येथे एक जुन्या पडसाळीत छापा टाकला. तेथे अवैद्य रित्या रंधा मशिनच्या सहाय्याने बनविलेले दोन खुर्ची सह सोफासेट, चार बाय सहा आकाराचे बॉक्स पलंग असे फर्निचर व इतर कट साइज साग चौपाट नग 21 तथा इलेक्ट्रिक मोटर, कटर ब्लेड व रंदा मशिन आढळुन आले.
60 हजार रुपयाचे किमतीचा मुद्देमाल वन विभागाच्या पथकाकडुन जप्त करुन शासकिय काष्ट आगार नवापूर येथे जमा करण्यात आला.
उपवसंरक्षक वनविभाग शहादा व उपवसंरक्षक दक्षता पथक धुळे तसेच सहायक वनसंरक्षक नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.
ही कार्यवाही नवापूर वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे, वनपाल डी.के.जाधव, वनरक्षक एस.ए.खैरनार, दिपाली पाटील, कमलेश वसावे, एस.बी.गायकवाड, एल.एस.पवार, माजी सैनिक रविंद्र कासे, वाहन चालक भगवान साळवे तथा वनमजुर व रोपवन रखवालदार यांनी केली.
दरम्यान, या कारवाईमुळे अवैध लाकूड व्यवसाय करणा:यांमध्ये खळबळ उडाली आहे.