नंदुरबारातील 64 टक्के बियाणे नमुन्यांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 01:28 PM2018-06-12T13:28:24+5:302018-06-12T13:28:24+5:30

शेतक:यांसाठी योग्य असल्याचा दावा : कापूस बियाण्याची 4 लाख पाकिटे

64 percent seed samples of Nandurbar | नंदुरबारातील 64 टक्के बियाणे नमुन्यांची तपासणी

नंदुरबारातील 64 टक्के बियाणे नमुन्यांची तपासणी

Next

नंदुरबार : गेल्या वर्षात ज्वारीच्या बोगस बियाण्यामुळे शेतक:यांचे नुकसान झाल्याने धसका घेतलेल्या कृषी विभागाने यंदा बियाणे विक्री सुरू होण्यापूर्वीच नमुने तपासणीसाठी पुणे येथे रवाना केले आहेत़ यातील 64 टक्के बियाणे नमुने तपासले गेले असून ते ‘योग्य’ असल्याचे खात्रीलायक सांगण्यात आले आह़े 
कृषी विभागाने पाठवलेल्या उर्वरित 26 टक्के बियाणे नमुन्यांची तपासणीही लवकरच पूर्ण होणार असून बियाण्यात दोष असल्यास तशी माहिती तत्काळ तालुका कृषी विभाग आणि जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिका:यांना देण्यात येऊन कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आह़े जिल्ह्यात गेल्या वर्षात कापसाचे सहा नमुने हे उत्पादन देऊ शकणार नसल्याचे सिद्ध झाल्यानंतर 6 बियाणे उत्पादकांवर कारवाई करून त्यांच्यावर न्यायालयीन कारवाई सुरू आह़े गेल्या खरीप हंगामात ज्वारीच्या नंबर 9 वाणाने शेतक:यांना फटका दिल्यानंतर तक्रारी करण्यात आल्या होत्या़ शेतक:यांना पुन्हा असा फटका बसून त्यांचे आर्थिक नुकसान टाळले जावे, यासाठी कृषी विभागाकडून त्या-त्या जिल्ह्यात विक्री होणा:या बियाणे विक्रेत्या कंपन्यांचे नमुने गोळा करून त्यांची तपासणी करण्याचे आदेश काढले गेले होत़े त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यात पुरवठा झालेल्या 40 टक्के तर ज्वारीसह इतर बियाण्यांचे 24 टक्के नमुने तपासण्यात आले आहेत़ 
शेतक:यांवर पुन्हा आर्थिक नुकसानीची वेळ येऊ नये यासाठी त्यांच्याकडून विश्वासार्ह आणि प्रमाणित अशा बियाण्यांची माहिती देण्यात येऊन कोणते, खरेदी करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात येत  आह़े कृषी विभागाने यंदा 57 हजार 883 क्विंटल बियाण्याची मागणी कृषी संचालनालय आणि महाबीज यांच्याकडे नोंदवली होती़ हे सर्वच बियाणे विक्रेत्यांकडे उपलब्ध करून देण्यात आले आह़े कापूस, ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन आणि तूरसह विविध कडधान्याच्या बियाण्याचा यात समावेश होता़ जिल्ह्यात एकूण 30 कंपन्यांचे हे बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आह़े यातही सोनेरी व चंदेरी रंगाचे टॅग असलेले विश्वासदर्शक तर निळ्या रंगाचा टॅग असलेले प्रमाणित या दोन प्रकारात बियाण्यांची विक्री सुरू आह़े बियाणे असलेल्या कापडी किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीवरील हे टॅग ओळखून त्याची खरेदी करण्याचे कृषी विभागाने शेतक:यांना सुचवले आह़े 
गेल्या वर्षात नंबर 9 ज्वारीच्या बियाण्यावर सोनेरी किंवा चंदेरी रंगाचे टॅग होत़े विश्वासदर्शक बियाणे असून शेतक:यांना आर्थिक फटका बसल्याने कृषी संचालनालयाने प्रमाणित केलेल्या बियाण्यांची खरेदी करण्याचा सल्ला दिला जात आह़े कृषी विभाग बियाणे खरेदी करण्याबाबत सल्ला देत असले तरी विश्वासदर्शक जर उगवणारच नसेल, तर मग त्याची विक्री कशासाठी असा प्रश्न उपस्थित केला जात आह़े जिल्ह्यात गेल्या वर्षात 2 लाख 72 हेक्टर क्षेत्रात खरीप पेरण्या करण्यात आल्या होत्या़ यात 1 लाख 18 हजार हेक्टर क्षेत्र कापसाने व्यापले होत़े बोंडअळीमुळे शेतक:यांना कापूस काढून फेकावा लागला असला तरी यंदा 1 लाख 28 हजार हेक्टर कापूस लागवड होणार असल्याचे स्पष्ट झाले आह़े शेतक:यांच्या मागणीनुसार कृषी विभागाने विक्रेत्यांना 4 लाख 67 हजार पाकिटे कापूस बियाणे उपलब्ध करून दिले आह़े यातील 20 टक्के बियाणे विक्री झाल्याची माहिती आह़े यामुळे कापूस बियाणे ‘शॉर्टेज’ होणार नसल्याचा दावा विभागाने केला आह़े विशेष म्हणजे विक्रेत्यांकडे गेल्या वर्षातील बियाण्याची काही हजार पाकिटे सुस्थितीत असल्याचे सांगण्यात आले आह़े 
खरीप हंगामासाठी बियाण्यासोबत 1 लाख 14 हजार मेट्रिक टन खताची मागणी केली होती़ यापैकी 93 हजार मेट्रिक टन खत पुरवठा करण्यात येणार आह़े या खताची विक्री ‘पॉस’ मशीनने करण्याची सक्ती करण्यात आली आह़े जिल्ह्यात एकूण 557 खत विक्रेते असून अनुदानित खतांची विक्री करणारे केवळ 170 विक्रेते आहेत़ ‘पॉस’ मशीनद्वारे खतांची विक्री केल्यानंतरच त्यांच्या खात्यावर शासनाकडून अनुदान देण्यात येणार आह़े मात्र जिल्ह्यात केवळ 159 खत विक्रेत्यांकडेच पॉस मशीन असून इतर 11 विक्रेत्यांची सोय करण्यासाठी विभागाने 10 पॉसची मागणी केली आह़े यातही 1 विक्रेता विनापॉस खत विक्री करणार आह़े 

Web Title: 64 percent seed samples of Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.