64 पाणीपुरवठा योजनांची वीज खंडित

By Admin | Published: March 15, 2017 12:34 AM2017-03-15T00:34:56+5:302017-03-15T00:34:56+5:30

आठ कोटींचे वीज बिल थकले : सारंगखेडा व प्रकाशा बॅरेज प्रकल्पांवरही अंधार

64 Water supply schemes break the power | 64 पाणीपुरवठा योजनांची वीज खंडित

64 पाणीपुरवठा योजनांची वीज खंडित

googlenewsNext

प्रकाशा : विजेचे बिल थकीत झाल्याने प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजसह तालुक्यातील 64 पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा वीज वितरण कंपनीने खंडित केला आहे. ज्या शासकीय कार्यालयांकडे वीज बिलांची थकबाकी आहे त्यांचाही वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.
वीज वितरण कंपनीच्या शहादा उपविभाग क्रमांक एकमध्ये येणारया शहादा तालुक्यातील 212 पाणीपुरवठा योजनांकडे आठ कोटी 94 लाख 39 हजार 484 एवढी रक्कम थकीत आहे. वारंवार नोटिसा देऊनही संबंधितांनी थकबाकीची रक्कम न भरल्याने 212 पैकी 64 पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा वीज कंपनीने खंडित केला आहे. विजेचे बिल व थकीत रक्कम वेळेवर भरली नाही तर ही मोहीम सुरूच राहणार आहे.
प्रकाशा बॅरेजकडे 25 हजार तर सारंगखेडा बॅरेजकडे 53 हजार 220  रुपयांची वीज बिल थकबाकी आहे. या दोन्ही बॅरेजेसचाही वीजपुरवठा वीज कंपनीने मंगळवारी खंडित केला. सद्यस्थितीत प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजचे सर्व दरवाजे बंद असून बॅरेज पाण्याने तुडूंब भरले आहेत. त्यातच अवकाळी पाऊस आला तर तापी नदीला पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नदीला पूर आल्यास वीजपुरवठय़ाअभावी एकही दरवाजा उघडणार नाही. त्यावेळी धोकेदायक स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे बॅरेज प्रशासनाने वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रय} करण्याची गरज आहे.
वीज कंपनीच्या शहादा उपविभाग क्रमांक एक अंतर्गत कोटय़वधी रुपयांची वीज बिल थकबाकी आहे. त्यातून फक्त 32 लाख 94 हजार रुपये वसूल झाले आहेत. कोटय़वधी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी वीज कंपनीकडून संबंधिताना नोटिसा पाठविल्या असून काहींचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. या उपविभागांतर्गत येणा:या शासकीय कार्यालयांनीही थकीत वीज बिल भरले नाही तर त्यांचाही वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.         वारंवार नोटिसा देऊनही थकीत          वीज बिल न भरणा:यांचा          वीजपुरवठा खंडित करण्याची सूचना कार्यकारी अभियंता धनंजय भामरे व उपकार्यकारी अभियंता किशोर    गिरासे यांनी संबंधितांना दिल्या आहेत.


पाणीपुरवठा योजना व प्रकाशा आणि सारंगखेडा बॅरेज प्रशासनासह शासकीय कार्यालयांना थकीत वीज बिल भरण्याबाबत वारंवार नोटिसा देऊनही थकीत बिल भरले जात नसल्याने त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे.
-धनंजय भामरे, कार्यकारी अभियंता, शहादा.
प्रकाशा व सारंगखेडा बॅरेज प्रशासनाला नियमानुसार वीज थकबाकी भरण्याविषयी नोटीस दिली आहे. त्यांनी थकबाकी न भरल्याने मंगळवारी दोन्ही बॅरेजचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
-किशोर गिरासे, उपकार्यकारी अभियंता, शहादा

Web Title: 64 Water supply schemes break the power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.