भाजल्याने 65 वर्षीय वृद्धेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:12 PM2019-08-28T12:12:28+5:302019-08-28T12:12:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क प्रतापपूर : तळोदा तालुक्यातील प्रतापपूर येथे अंगावर रॉकेलचा पेटता दिवा पडून गंभीर भाजलेल्या वृद्धेचा मृत्यू झाला़ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
प्रतापपूर : तळोदा तालुक्यातील प्रतापपूर येथे अंगावर रॉकेलचा पेटता दिवा पडून गंभीर भाजलेल्या वृद्धेचा मृत्यू झाला़ मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता ही घटना घडली होती़
सुमनबाई श्रीराम पाटील (65) असे मयत वृद्धेचे नाव आह़े मंगळवारी सकाळी सुमनबाई ह्या बाथरुममध्ये गेल्या होत्या़ याठिकाणी वीज नसल्याने त्यांनी रॉकेलचा दिवा लावला़ हा दिवा त्यांच अंगावर पडल्याने त्या गंभीररित्या भाजल्या होत्या़ त्यांना तातडीने तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होत़े याठिकाणी उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला़ शवविच्छेदन करुन त्यांचा मृतदेह नातेवाईकांना सोपवण्यात आला़ याबाबत त्यांचा मुलगा प्रदीप श्रीराम पाटील यांनी तळोदा पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आह़े तपास पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलीस कॉन्स्टेबल कमलसिंग जाधव करत आहेत़ घटनेमुळे प्रतापपूर गावात हळहळ व्यक्त होत होती़