66 ग्रा.पं.चा निवडणुकांची रणधुमाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 12:40 PM2018-08-24T12:40:33+5:302018-08-24T12:40:40+5:30

जि.प.निवडणुकांची रंगीत तालीम : मोठय़ा गावांचा समावेश, 26 सप्टेंबरला मतदान

66 Gram Panchayat elections | 66 ग्रा.पं.चा निवडणुकांची रणधुमाळी

66 ग्रा.पं.चा निवडणुकांची रणधुमाळी

Next

नंदुरबार : जिल्ह्यातील 66 मोठय़ा ग्रामपंचायतींची रणधुमाळी 27 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. 26 सप्टेंबरला मतदान होणार आहे. शहादा, नंदुरबार, नवापूर जिल्ह्यातील अनेक मोठय़ा ग्रामपंचायतींचा त्यात समावेश आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची ही रंगीत तालीम  राहणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाचे लक्ष निवडणुकांकडे राहणार आहे.
नोव्हेंबर महिन्यात मुदत संपणा:या ग्रामपंचायतींचा निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने घोषीत केला आहे. त्यानुसार सप्टेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात अर्थात 26 सप्टेंबर रोजी या ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये अनेक मोठय़ा आणि जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या ग्रामपंचायतींचा समावेश राहणार आहे. त्यामुळे सर्वच    राजकीय पक्षांकडून या ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी चढाओढ राहणार आहे. थेट जनतेतून सरपंच निवड असल्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांनाही आता मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
या आहेत ग्रामपंचायती
शहादा तालुक्यातील गावांमध्ये आडगाव, कमरावद, कुढावद, कजर्ाेत, गोगापूर, गणोर, बिलाडीतर्फे सारंगखेडा, करजई, जयनगर, पिंप्री, दामळदा, लांबोळा, लोंढरे, लक्कडकोट, विरपूर, वाघोदा, उजळोद, कवळीथ, कुसूमवाडे, जाम, तितरी, नवानगर, देऊर, मलोणी, भोरटेक, सोनवलतर्फे बोरद, सावळदे, अनरद, गोदीपूर, बोराळे, वाघर्डे, श्रीखेड.
नंदुरबार तालुक्यातील कोरीट, भागसरी, धामडोद,  वावद, उमर्देखुर्द, आडछी, केसरपाडा, ईसाईनगर, सैताणे, बलवंड, बह्याणे, कलमाडी, समशेरपूर, लोणखेडा, जांभीपाडा, गुजर जांभोली, पिंपळोद, अक्राळे, होळतर्फे रनाळे, सुजालपूर, जुनमोहिदा, नाशिंदे, बोराळे.
नवापूर तालुक्यातील श्रावणी, निंबोणी, खोलविहिर, सुळी, सोनखडके.
तळोदा तालुक्यातील लाखापूर फॉरेस्ट, इच्छागव्हाण, राणापूर, मालदा तर अक्कलकुवा तालुक्यातील काठी व मालपाडा या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
रंगीत तालीम
या निवडणुका म्हणजे ऑक्टोबर महिन्यात होणा:या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रंगीत तालीम राहणार आहे. यंदा या दोन्ही निवडणुका अतिशय अटीतटीच्या आणि तेवढय़ाच प्रतिष्ठेच्या राहणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त मोठय़ा ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, सेना व इतर सर्वच राजकीय पक्ष प्रय}शील राहणार आहेत. 
थेट सरपंच निवड
निवडणुका होणा:या 66 ग्रामपंचायतींमध्ये प्रथमच थेट सरपंच निवड होणार आहे. त्यामुळे या गावांमध्ये मोठय़ा राजकीय घडामोडी घडणार आहेत. त्यादृष्टीने तयारीही सुरू करण्यात आली आहे. 
निवडणूक आयोगाने अचानक निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याने आता या गावांमध्ये एकच         धावपळ उडणार आहे. येत्या 5 सप्टेंबरपासून निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास सुरवात होणार   आहे. 
ऑनलाईन अजर्
या निवडणुकीसाठी नवीन नियमाप्रमाणे ऑनलाईन अर्ज दाखल करावे लागणार आहेत. त्याची मुळप्रत निवडणूक निर्णय अधिका:यांकडे दाखल करावी लागणार आहे. निवडणुकीची सर्व प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारे होणार आहे. 
याशिवाय तहसीलदारांनी निवडणुकीचा कार्यक्रम घोषीत केल्याच्या तारखेपासून ते मतदान होईर्पयत या गावांमध्ये आचारसंहिता लागू राहणार आहे. त्यामुळे सप्टेंबरपासून ते ऑक्टोबर अखेर्पयत अर्थात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका होईर्पयत या गावांना आचारसंहितेचा अडसर राहणार आहे. त्यामुळे सलग दोन ते अडीच महिने या गावांना आचारसंहितेत काढावे लागणार आहेत.  
 

Web Title: 66 Gram Panchayat elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.