अक्कलकुवा आगारातील ६८ कर्मचारी सक्तीच्या रजेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 12:25 PM2020-07-22T12:25:49+5:302020-07-22T12:25:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : ़अक्कलकुवा आगारातील चालक, वाहक व इतर तांत्रिक अशा ६८ कर्मचाऱ्यांना आगार प्रमुखांनी वरिष्ठांच्या आदेशान्वये ...

68 employees on compulsory leave | अक्कलकुवा आगारातील ६८ कर्मचारी सक्तीच्या रजेवर

अक्कलकुवा आगारातील ६८ कर्मचारी सक्तीच्या रजेवर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अक्कलकुवा : ़अक्कलकुवा आगारातील चालक, वाहक व इतर तांत्रिक अशा ६८ कर्मचाऱ्यांना आगार प्रमुखांनी वरिष्ठांच्या आदेशान्वये २० दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. येणाºया काळात अजून अनेक कर्मचाऱ्यांना त्याचा जबर फटका बसणार असल्याचे संकेत दिसत असल्याने कर्मचाºयांमध्ये नाराजी पसरली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या संकटकाळात शासनाने कामगार वर्गाला मदत करण्याऐवजी त्यांचे कंबरडे पूर्णपणे मोडण्याचा सपाटा लावला आहे. याची प्रचिती आता महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या कर्मचाºयांना येऊ लागली आहे. ऊन, वारा, पाऊस, थंडी व दिवस-रात्रचा विचार न करता अखंडपणे सेवा देणारे कर्मचाºयांना त्याची प्रचिती येऊ लागली आहे. कधी चकाचकीत तर कधी खाचखळग्याच्या रस्त्यावर तर कधी जीवघेण्या घाटात धावणाºया लालपरीने कधी नव्हे ती एवढी विश्रांती चार महिन्याच्या काळात घेतली आहे. या विश्रांतीच्या काळात प्रत्येक दिवसाला सहा लाख एवढे नुकसान होत असल्याचे सांगण्यात येते. परिणामी अक्कलकुवा आगारातील २६ चालक, २६ वाहक व २६ तांत्रिक कर्मचाºयांना मुंबई येथून फतवा काढून २० दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. चालक व वाहक यांना १२ जुलै ते ३१ जुलैपर्यंत तर २६ तांत्रिक कारागीर व अन्य कर्मचाºयांना १६ जुलैपासून ४ आॅगस्टपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. अक्कलकुवा आगारात ६२ बसेस उपलब्ध असून यासाठी ८६ वाहक व ९६ चालक कार्यरत आहेत. त्यांना मार्च महिन्यात ७५ टक्के, एप्रिल महिन्यात पूर्ण १०० टक्के, मे महिन्यात बेसिकच्या ५० टक्के वेतन अदा करण्यात आले आहे तर जून महिन्याचे वेतन आजपर्यंत जमा झालेले नाही. त्यामुळे या कर्मचाºयांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. वाहक व चालक यांना मंदीच्या काळात २० दिवस तर गरजेनुसार इतर २० दिवस अशा ४० दिवसांच्या रजा वर्षभरात घेता येतात. कर्मचाºयांना ज्यावेळी रजेची गरज असताना त्यांना अधिकाºयांची विनवणी करावी लागत असते. आता कर्मचाºयांना रजेची गरज नसतानाही सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याने कर्मचाºयांमध्ये नाराजी पसरत आहे. आधीच मे महिन्याच्या वेतन सरसरीत ५० टक्के कर्मचाºयांना झळ बसलेली आहे.

Web Title: 68 employees on compulsory leave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.