शनिमांडळ येथे पुराच्या पाण्याने 70 घरांचे नुकसान
By admin | Published: June 13, 2017 04:45 PM2017-06-13T16:45:22+5:302017-06-13T16:45:22+5:30
व्यावसायिकांचे नुकसान : मंगळवारी पहाटे दीड तास मुसळधार पाऊस
Next
ऑनलाईन लोकमत
शनिमांडळ,जि.नंदुरबार,दि.13 : नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळसह परिसरात मंगळवारी पहाटेच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली़ दीड तास झालेल्या या पावसामुळे शनिमांडळ गावातून वाहणा:या लेंडी नाल्याला पूर येऊन बसस्थानक परिसर व नाल्याच्या काठावरील घरांमध्ये पाणी घुसल़े यात अनेकांचे संसारोपयोगी साहित्य वाहून गेले होत़े
मंगळवारी पहाटे दोन ते साडेतीन या दरम्यान वीजांच्या कडकडाटासह सुरू झालेल्या पावसाने चांगला जोर धरल्याने शनिमांडळ परिसरातील शेतशिवारात पाणी साचले होत़े एकाच रात्रीत कोसळलेल्या या पावसामुळे शेततळे, बांध, लहान बंधारे ओव्हर फ्लो झाल्याने शेतीबांध फुटूल्याचे दिसून आले होत़े परिणामी काही ठिकाणी लागवड झालेल्या कापसाचे नुकसान झाले आह़े अनेक ठिकाणी टाकलेले खत वाहून गेले होत़े तुफानी पावसामुळे शेतीची मोठय़ा प्रमाणावर झीज होऊन नुकसान झाले आह़े
दीड तास सुरू असलेल्या या पाण्यामुळे शनिमंदीराला लागून वाहणा:या लेंडी नाल्याला पूर आला होता़ यामुळे बसस्थानक परिसरातील घरांमध्ये पाणी घुसले, या भागात 60 ते 70 नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याने घबराट पसरली होती़ मोठा पूर आल्याची अफवा पसरल्याने अनेकांनी गावातील उंच भागात धाव घेतली, तर काहींनी कुटूंबियांना घरांच्या छतावर पोहोचवल़े
याच दरम्यान बसस्थानक परिसरातील व्यावसायिकांच्या टप:यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होत़े