घरकुलसाठी अॅप असताना 70 हजार अर्ज विक्री, जि.प.सभेत माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 01:33 PM2018-09-08T13:33:10+5:302018-09-08T13:33:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा परिषदेतर्फे राबवण्यात येणा:या घरकुल योजनेची माहिती मोबाईल अॅपद्वारे भरली जात असताना लाभार्थीकडून ग्रामसेवकांनी छापील अर्ज भरून घेत हजारो रूपये लाटल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्यांनी सर्वसाधारण सभेत केला़ शहादा तालुक्यात तब्बल 70 हजार विक्री करण्यात आल्याचा आरोप सभेत करण्यात आला़ या आरोपामुळे पदाधिकारी व अधिकारी गोंधळले होत़े
जिल्हा परिषदेच्या याहामोगी सभागृहात यंदाच्या कार्याकाळाची शेवटची सभा शुक्रवारी घेण्यात आली़ सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रजनी नाईक होत्या़ प्रसंगी व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, सभापती हिराबाई पाडवी, लताबाई पाडवी, दत्तू चौरे, आत्माराम बागले, अतीरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष सांगळे उपस्थित होत़े शेवटची सभा असल्याने सभेबाबत जिल्हाभरात उत्सुकता होती़ परंतू तुरळक आरोपांच्या फैरी आणि त्यावर झालेल्या चर्चेमुळे सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली़ प्रारंभी मागील सभेचा आढावा घेण्यात आला़
सभेत आयत्या वेळच्या विषयात चर्चा सदस्यांनी शहादा तालुक्यातील घरकुल योजनांच्या ड यादीचा प्रश्न उपस्थित केला़ यावर स्पष्टीकरण देणा:या ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्पाधिकारी संदीप माळोदे यांनी अँड्रॉईड अॅपवरून ग्रामसेवकांनी भरून दिलेल्या माहितीनुसार ड यादी तयार करण्यात आल्याचे सांगितल़े यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज नसल्याचे ते म्हणाले, या उत्तरानंतर सदस्यांनी ग्रामसेवकच लाभार्थीकडून रक्कम उकळत असल्याचा तसेच अर्ज विक्री करत असल्याचा आरोप केला़ यावर उत्तर देताना मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषद अध्यक्षा यांनी चौकशी करण्याबाबत चर्चा करून कारवाई करणार असल्याचे सदस्यांना सांगितल़े सभेच्या शेवटी स्वर्गीय माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली़
आवास योजनांसाठी प्रशासनाने ड यादी मंजूर केली आह़े याव्यतिरिक्त इच्छुकांना लाभ देण्यासाठी ग्रामसभा घेऊन ग्रामसेवक व ग्रामपंचायतीने नावे ही प्रशासनाला सुचवायची आहेत़ त्यानंतर प्रशासन इच्छुकाचे सव्रेक्षण करून लाभ देणार होत़े यात अॅपद्वारे माहिती संकलित होणार होती़ तत्पूर्वीच गावागावांमध्ये घरकुल योजनांसाठी इच्छुकांचे अर्ज भरणे सुरू झाल़े हे अर्ज नेमके आले कुठून असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला़ लाभार्थीना अर्ज विक्री करण्याच्या प्रकाराची शहादा तालुक्यात सर्वाधिक चलती असल्याचा आरोप करण्यात आला आह़े तसेच हे अर्ज विकून ग्रामसेवकच घरकुल योजनांचा धंदा करत असल्याचा गंभीर आरोप सभेत करण्यात आला़ सदस्यांनी मागणी केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कारवाईचे संकेत दिले आहेत़