सोनवद येथील आगीत 70 हजारांचा कापूस खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 04:43 PM2019-01-10T16:43:45+5:302019-01-10T16:43:52+5:30

सोनवद येथील घटना : दुष्काळात जेमतेम आलेले उत्पन्नही गेले वाया

70,000 cotton yarn in Sonvad | सोनवद येथील आगीत 70 हजारांचा कापूस खाक

सोनवद येथील आगीत 70 हजारांचा कापूस खाक

Next

शहादा :  तालुक्यातील सोनवद येथे बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास शिवाजी पुंडलिक पाटील यांच्या घरात असलेल्या 13 क्विंटल कापसाला शॉर्टसर्कीटमुळे आग लागून बाजार भावाप्रमाणे 60 ते 70 हजार रुपयांचा कापूस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. 
बुधवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. आग्निउपद्रवाची माहिती मिळताच नगरपालिकेचा अग्नीशामक बंब वेळेवर पोहोचल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. आग लागली तेव्हा घरी कोणीही नव्हते. शेतक:यांनी भाव वाढीच्या अपेक्षेने आपला कापूस घरात व गोडाऊनमध्ये ठेवलेला आहे. सोनवद येथील शिवाजी पुंडलिक पाटील या कोरडवाहू शेतक:याने भाव वाढेल या आशेने कापूस आपल्या घरात भरून ठेवला होता. ते मंगळवारी स्वत:च्या खाजगी कामानिमित्त औरंगाबाद येथे गेले होते. थंडीचे दिवस असल्याने ग्रामीण भागात रात्री आठ वाजेनंतर शुकशुकाट होतो. बुधवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास शिवाजी पाटील यांच्या घरात कापसाला आग लागल्याचे शेजा:यांना कळाल्याने या घराला कुलूप असल्याने ते तोडणे अवघड झाले होते. दरम्यान आगीने विद्रूप रूप धारण केले होते. आग विझविण्यासाठी गावातील दीपक पाटील, पंडित पाटील, ऋषिकेश पाटील, संजय पाटील, ईश्वर पाटील, जयवंत पाटील, चंद्रकांत पाटील, विकास पाटील, शरद पाटील, दिनेश पाटील, राहुल पाटील, मनोज न्हावी व ग्रामस्थांनी सहकार्य केले.
 दीपक पाटील यांनी जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांना या घटनेची माहिती दिली. या वेळी अभिजित पाटील यांनी तातडीने नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला माहिती देत सोनवद येथे घटनास्थळी पाठवले. गावात घर असल्याने अग्नीने पेट घेतल्यामुळे शेजारील घरांनाही त्याची झळ पोहचण्याची शक्यता असल्याने गावातील तरुण व ग्रामस्थांनी मिळेल तेथून पाणी आणून आग विझवण्यासाठी प्रय} केला. याप्रसंगी शहादा नगरपालिकेचा बंबदेखील वेळेवर पोहोचल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. 
एकीकडे शेतक:यांच्या कापसाला भाव नसल्याने शेतकरी भाव वाढीच्या अपेक्षेने कापूस घरातच साठवून ठेवत आहे. शेत मालाला भाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, अनेक ठिकाणी साठवून ठेवलेल्या कापसाला आग लागल्याच्या घटना घडत आहे. यात शेतक:यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान होत आहे. शेतक:यांच्या शेती मालाला भाव नसल्याने शेती करावी की, नाही हा यक्ष प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला आहे.
शेतक:यांच्या मालाचा कृषी विभागाचे विम्याचे कवच असेल तर शेतक:यांना तातडीची मदत करावी, अशी मागणी होत आहे.
 

Web Title: 70,000 cotton yarn in Sonvad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.