नंदुरबारातील 71 ग्रामपंचायतीत नवीन प्रभाग रचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 12:59 PM2018-05-24T12:59:57+5:302018-05-24T12:59:57+5:30

71 new gram panchayat in Nandurbar | नंदुरबारातील 71 ग्रामपंचायतीत नवीन प्रभाग रचना

नंदुरबारातील 71 ग्रामपंचायतीत नवीन प्रभाग रचना

Next

ऑनलाईन लोकमत
नंदुरबार, दि़ 24 : ऑक्टोबर 2018 ते सप्टेंबर 2019 या काळात मुदत संपणा:या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमासाठी नवीन प्रभाग रचना आणि आरक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आह़े निवडणूक आयोगाने यासंदर्भातील वेळापत्रक जाहिर केले असून 18 जूनपासून या प्रक्रियेला सुरूवात करण्यात येणार आह़े या प्रक्रियेत जिल्ह्यातील 71 ग्रामपंचायती समाविष्ट आहेत़ 
मंगळवारी रात्री उशिर राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना आणि आरक्षण कार्यक्रम जाहिर केला आह़े यानुसार 18 जून पासून त्या-त्या तालुक्यातील तहसीलदार यांनी गुगल मॅपवर एमआरएसएसीचे नकाशे सुपर इम्पोस करून नकाशे अंतिम करणे, 25 जून र्पयत तलाठी, ग्रामसेवक यांनी स्थळ पाहणी करून प्रभाग पाडणे, सिमा निश्चिती, अनुसुचित जाती व जमाती यांचे आरक्षण निश्चित करणे, 30 जून र्पयत तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने प्रारूप प्रभाग रचनेला मान्यता देणे व सर्व सदस्यांनी स्वाक्षरी करणे, 7 जुलै र्पयत त्या-त्या गावातील ग्रामसभा बोलावून तहसीलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिका:याच्या अध्यक्षतेखाली प्रारूप प्रभाग रचनेवर आरक्षणाची सोडत काढणे, 11 जुलैर्पयत नमुना ब प्रसिद्ध करण्यापूर्वी तहसील कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाने असे प्रस्ताव प्राप्त करून त्याची संक्षिप्त प्राथमिक तपासणी करणे व त्यात आवश्यक असल्यास दुरूस्त्या करणे तर 12 जुलै र्पयत या दुरूस्त्या अंतभरूत करून प्रारूप प्रभाग रचना व आरक्षणाला तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मान्यता द्यावी व समितीच्या सर्व सदस्यांनी सही करावी असे सुचवण्यात आले आह़े 
प्रारूप प्रभाग रचनेवर ग्रामस्थांना हरकती व सूचना करता येणार आहेत़ यानुसार 13 जुलैर्पयत प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करून जाहिर सूचना करण्यात यावी, 20 जुलैर्पयत हरकती सादर करता येतील, 21 जुलैर्पयत प्राप्त झालेल्या सर्व हरकती व सूचना सुनावणीसाठी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात येतील तर वेळापत्रकानुसार 31 जुलैर्पयत उपविभागीय अधिकारी हरकतींवर सुनावणी घेणार आहेत़ प्रभाग रचना व आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सप्टेंबर 2019 र्पयत या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहिर करण्यात येणार आह़े 
 

Web Title: 71 new gram panchayat in Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.