खापर येथील जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात 72 उपकरणांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 12:41 PM2019-02-05T12:41:57+5:302019-02-05T12:42:02+5:30
नंदुरबार : जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात 72 उपकरणे सादर करण्यात आली आहे. कृषी आणि जैविक शेती, पायाभूत सुविधा या उपकरणांना ...
नंदुरबार : जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात 72 उपकरणे सादर करण्यात आली आहे. कृषी आणि जैविक शेती, पायाभूत सुविधा या उपकरणांना विद्याथ्र्यानी प्राधान्य दिल्याचे चित्र प्रदर्शनातून दिसून येत आहे.
खापर येथील जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ आणि ईरा इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांच्या हस्ते रिमोटद्वारे दीपप्रज्वालन करून करण्यात आले. अध्यक्षस्थानी राजेंद्र सोनार होते. जि.प. सदस्य नितेश वळवी, नागेश पाडवी, पंचायत समितीचे उपसभापती इंद्रपालसिंह राणा, नगरसेवक चारुदत्त कळवणकर, सरपंच करूणाबाई वसावे, उपसरपंच विनोद कामे, उपशिक्षणाधिकारी डॉ.युनूस पठाण, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुकेश पाटील, उपाध्यक्ष जयदेव पाटील, सचिव पुष्पेंद्र रघुवंशी, योगेश सोनार, सहा.शिक्षण उपनिरीक्षक दिनेश देवरे, गटशिक्षणाधिकारी सचिन गोसावी, निमेश सूर्यवंशी, कपूरचंद मराठे, सुनील भामरे, दत्तात्रय सूर्यवंशी, ललीत जाट, प्रियंका सोनार, प्रेमलता अग्रवाल, अजय पटेल, देवानंद वसावे आदी उपस्थित होते.
या वेळी डॉ.गावीत यांनी सांगितले की, विद्याथ्र्यानी शिक्षकांकडून प्रेरणा घेवून शास्त्रज्ञवृत्ती स्वत:मध्ये जोपासली पाहिजे. स्वत:ला शिस्त लावून घ्यावी ती पाळली तर जीवनात यशस्वी होण्यासाठी हा एक गुण पुरेसा आहे. दैनंदिन जीवनात घडणा:या गोष्टीमध्ये विज्ञान दडलेले असते ते जाणून घेतले पाहिजे. अतिदुर्गम भागातही मोबाईल कनेक्टिव्हिटी वाढली आहे. त्याचा चांगला उपयोग करून घ्यावा असे आवाहन केले.
मुकेश पाटील यांनी विज्ञान प्रदर्शन शहरात घेण्यापेक्षा ग्रामीण भागातही प्रदर्शन भरवावे या उद्देशाने खापरला घेतले असल्याचे सांगितले. काँक्रिटच्या जंगलासाठी शेतीचा वापर वाढल्याने उत्पादनाचे क्षेत्र कमी होत असतांना विज्ञानाच्या सहाय्याने कमी जागेत व नवीन बियाण्यांच्या सहाय्याने जास्त उत्पादन मानवाने कसे घेता येईल हे शोधून काढले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी ललीत जाट, नागेश पाडवी, योगेश सोनार, प्राचार्य डी.बी. अलेक्झांडर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक दिनेश देवरे यांनी केले. सूत्रसंचालन अश्विन सोनार, गोटू वळवी तर आभार पुष्पेंद्र रघुवंशी यांनी मानले.